Shocking Video : मृतदेहाशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र
सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा दावा एका व्हिडीओद्वारे केला जात (Sion Hospital Corona Patient Death body) आहे.
मुंबई : सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा दावा एका व्हिडीओद्वारे केला जात (Sion Hospital Corona Patient Death body) आहे. ज्या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवले आहेत. या धक्कादाय घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Sion Hospital Corona Patient Death body) आहे.
हा व्हिडीओ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे सुपूत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामुळे आता मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
“सायन रुग्णालयात रुग्णांच्या शेजारी मृतदेह सुद्धा ठेवले आहेत. काय प्रशासन आहे हे… अत्यंत लज्जास्पद”, असं नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
In Sion hospital..patients r sleeping next to dead bodies!!! This is the extreme..what kind of administration is this! Very very shameful!! @mybmc pic.twitter.com/NZmuiUMfSW
— nitesh rane (@NiteshNRane) May 6, 2020
माजी मुख्यमंत्र्यांचेही सायन रुग्णालयातील प्रकरणावर ट्वीट
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सायन हॉस्पिटलमधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.”
सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.#CoronaInMumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
“कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांचे मृतदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक घाबरत होते. त्यामुळे हे मृतदेह आम्ही तिथे ठेवले होते. आता आम्ही हे मृतदेह तेथून हटवले असून या घटनेची अधिक चौकशी सुरु आहे”, असं सायन रुग्णालयाचे डीन डॉक्टर प्रमोद इंगळे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण