AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील झोपडवासीयांच्या जागेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला (Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar by BJP leader Kirit Somaiya).

मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या
| Edited By: | Updated on: Sep 24, 2020 | 12:18 AM
Share

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील झोपडवासीयांच्या जागेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला (Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar by BJP leader Kirit Somaiya). तसेच त्यांची 48 तासात हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. पेडणेकर यांच्यावर कारवाई न केल्यास महापालिकेसमोर धरणा आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

किरीट सोमय्या म्हणाले, “महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या (SRA) जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. 48 तासामध्ये पेडणेकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही, तर मी महापालिका समोर “धरणा” आंदोलन करणार आहे.”

“मूळ लाभार्थ्यांना 2006/2008 मध्ये गोमाता जनता (SRA) सोसायटीत (गणपतराव कदम मार्ग, वरळी) सदनिका देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक 2 मधील 601 हा गाळा अलॉट करण्यात आला होता. त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचं नाव नव्हतं. हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने देण्यात आला आहे. परंतु, त्या गाळ्यावर गेली 8 ते 10 वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकरांचा कब्जा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे. येथे याच बिल्डिंग क्र. 1 मधील तळमजला, गाळा क्र. 4 ही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. परंतु हा गाळा पण किशोरी पेडणकर परिवाराच्या ताब्यात किश कॉपोरेशनचे कार्यालय म्हणून आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

“महापौरांनी स्वतः स्थापन केलेले किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय या ठिकाणी आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: आणि SRA अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली. तसेच पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी करण्यात येत आहे. यापैकी बिल्डिंग क्र. 1, तळमजला, येथे रहिवाशी उपयोगाचे प्रमाणपत्र/Permission होती/आहे. त्यावर या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

“मुंबईचे महापौर आणि त्यांचं कुटुंब झोपडवासीयांच्या जागेत बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर करत आहेत. त्यावर महापालिका व SRA ने अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. 2013 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली व कंपनी कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी अधिकृतरीत्या महापौर/परिवारांनी हा पत्ता व्यावसायिक कार्यालय म्हणून दिला आहे,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा :

नवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.