मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग, चार दुकानं जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली होती. आज पहाटे पाचच्या सुमारास या ठिकाणच्या काही दुकांनांना आग लागली.

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग, चार दुकानं जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 2:28 PM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात (Fire At Crawford Market) आज पहाटे पाचच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागली. आग प्रचंड भीषण होती. त्यामुळे या आगीत आजूबाजूची चार दुकानं जळून खाक झाली. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरल्याने दुकानदार आणि स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली असून या परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे (Fire At Crawford Market).

क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील 31, 32 अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत मेडिसीन, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तसेच, या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग पसरल्याचं सांगण्यात येत आहे.

दिलासादायक म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळेत नियंत्रण मिळवलं त्यामुळे मोठी हानी टळली. तसेच, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सर्व नागरिकांनी सुखरुप बाहेर काढण्यात जवानांनी यश आलं.

त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंग ऑपरेशन राबवत आहे.

Fire At Crawford Market

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.