ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? आज सुनावणी

मुंबई : ओबीसी सामाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा पुन्हा आढावा घेण्यात यावा, ज्या समाजाला बेकायदेशीर आरक्षण देण्यात आलं आहे त्यांना वगळण्यात यावं, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती यांनी ही याचिका सुनावणीसाठी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाकडे पाठवली आहे. […]

ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? आज सुनावणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : ओबीसी सामाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा पुन्हा आढावा घेण्यात यावा, ज्या समाजाला बेकायदेशीर आरक्षण देण्यात आलं आहे त्यांना वगळण्यात यावं, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती यांनी ही याचिका सुनावणीसाठी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाकडे पाठवली आहे. सुरुवातीला सरकारी वकिलांनी या याचिकेतील मुद्दे योग्य आहेत, असे म्हणल्याने वाद झाला होता. आज या याचिकेच्या सुनावणीत काय होते, याकडे ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

बाळासाहेब सराटे यांनी याचिकेतून काय मागणी केलीय?

20 डिसेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती.

इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

तसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.

कोण आहेत बाळासाहेब सराटे?

  • बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
  • त्यांनी मराठा आरक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
  • त्यांनी अनेक वर्ष मराठा आरक्षणाच्या तांत्रिक बाबी मांडल्या.
  • मात्र बाळासाहेब सराटेंवरच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.
  • आरक्षण सर्व्हेचं काम सराटेंच्या एजन्सीला दिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला होता.
  • सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाने केला होता.
  • मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्यापासून लांब राहिलेले बाळासाहेब सराटे पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी कायद्याच्या कसोटीवर लढाई सुरु केली.

संबंधित बातम्या :

ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? सुनावणीची तारीख ठरली!

… तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल : बाळासाहेब सराटे

मराठा आरक्षण : घुसखोरी नको, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही : सचिन माळी

मराठ्यांना 16 टक्के आरक्षण, महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती काय?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.