AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीनंतर मुंबईत रुग्णसंख्या घटली, पण दिल्लीची अवस्था पाहता महापालिका अलर्ट मोडवर

मार्च महिन्यातला सर्वात कमी कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा दिवाळीनंतर समोर आला आहे.

दिवाळीनंतर मुंबईत रुग्णसंख्या घटली, पण दिल्लीची अवस्था पाहता महापालिका अलर्ट मोडवर
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:42 PM

मुंबई : सुरुवातीला सगळ्यात जास्त धोक्यात असलेली मुंबई आता कोरोनाच्या संसर्गातून सावरताना दिसत आहे. कारण, मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख घसरत असल्याचं समोर आलं आहे. पण तरीदेखील दिल्लीची स्थिती पाहता मुंबईत पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यातला सर्वात कमी कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा दिवाळीनंतर समोर आला आहे. (In Mumbai number of covid patients declining compared to tests rate)

अधिक माहितीनुसार, दिवाळीपूर्वी 11 तारखेला चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 7.83% होतं. यानंतर दिवाळी लक्ष्मी पुजनच्या दिवशी बाधित रुग्णांचं प्राण 10.63% वर गेलं होतं. मात्र, 19 तारखेला दिवाळीनंतर मार्च महिन्यातील आता

पर्यंतच्या सर्वाधिक 17260 कोरोनाच्या चाचण्या झाल्या पण यापैकी फक्त 1018 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

गुरुवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला मार्च महिन्यातील सर्वात कमी बाधित रुग्णांचं प्रमाण 5.90 % इतकं प्रमाण नोंदवलं गेलं. एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असला तरीदेखील पालिक आणखी सतर्क झाली आहे. कोरोना रुग्णांच्या चाचण्या वाढवण्यापासून ते इतर बाबींकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. (In Mumbai number of covid patients declining compared to tests rate)

‘दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान’

दरम्यान, कोरोनाचा धोका कमी होतोय म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

राजधानी दिल्लीतील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दिल्लीतील शहीद भगतसिंग ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांनी एक व्हिडीओ पोस्ट करत कोरोना स्थितीची गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. हा व्हिडीओतील दोन्ही स्वयंसेवक कोविड मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मदत करत आहे. तसेच दिल्लीतील नेमकी परिस्थिती कशी आहे, हे सांगितलं आहे.

इतर बातम्या –

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

दिलासादायक ! मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालवधी 300 दिवसांवर, सध्या 11 हजार सक्रिय रुग्ण

(In Mumbai number of covid patients declining compared to tests rate)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.