मुंबईत मेडिकल सर्टिफिकेटसाठी मजुरांची रांग, घरी जाण्यासाठी कागदांची जुळवाजुळव

मुंबईत वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे (Crowd for Medical Certificate in Mumbai).

मुंबईत मेडिकल सर्टिफिकेटसाठी मजुरांची रांग, घरी जाण्यासाठी कागदांची जुळवाजुळव
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 8:20 PM

मुंबई : सरकारने लॉकडाऊन दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली. यानंतर मुंबईत वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे (Crowd for Medical Certificate in Mumbai). दवाखान्याबाहेर लागलेल्या रांगा इतक्या मोठ्या आहेत की त्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पोलिसांना पुढे यावं लागलं आहे. घराच्या ओढीने उभ्या असलेल्या या नागरिकांना अंतर ठेऊन उभं राहण्यास सांगताना पोलिसांना विशेष मेहनत करावी लागत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये आणि तो नियंत्रणात आणावा यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यावेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर काम करणारे मजूर अडकले. आता सरकारकडून गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी मजुरांची धावपळ सुरु झाली आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट होण्यासाठी सरकारी दवाखान्याचं किंवा एमबीबीएस डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी मजुरांनी दवाखान्यांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील याच मजुरांना मालाडमधील सबवेजवळ डॉ. संजीव डी. मनिहार घरी जाण्यासाठी आवश्यक असलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या दवाखान्याबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली. विशेष म्हणजे शहरात अनेक डॉक्टर आहेत, मात्र अनेक डॉक्टर मजुरांची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी उपलब्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे डॉ. मनिहार यांच्यासारखे जे मोजके लोक असं प्रमाणपत्र देत आहेत तेथे मजुरांना नाईलाजाने गर्दी करावी लागत असल्याचं मत काही मजुरांनी व्यक्त केलं आहे.

हे प्रमाणपत्र मिळाल्यावरच घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने मजुरांकडून यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत. त्यातच फिजीकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत असल्याचं काही प्रमाणात दिसत आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांनी अशा ठिकाणी येऊन अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने अनेक नागरिकांनी भर उन्हात मूळ गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या. यामुळे फिजीकल डिस्टन्सिंग राखणे अवघड होत आहे.

पुण्यातील खडकमाळ तहसील कार्यालयासमोर आज (2 मे) दुपारी 12 च्या सुमारास (Pune Lockdown people Rush Tehsil Office) गावी जाणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती. यातील अनेक जण हे तहसील कार्यालयात पास मिळणार असल्याच्या अफवेने जमा झाले होते. यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दी

Pune Corona | पुण्याचा मृत्यूदर काही केल्या घटेना, देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

Labours gathered out side Clinic for Medical Certificate in Mumbai

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.