दुधाला 30 रुपये दर द्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महायुतीचे राज्यव्यापी आंदोलन

सोमवारी (20 जुलै) राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला आहे

दुधाला 30 रुपये दर द्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महायुतीचे राज्यव्यापी आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 7:11 AM

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रुपये अनुदान (Mahayuti Ptotest For Milk Producer Farmers) थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे. तसेच, गाईच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, या मागण्यांसाठी सोमवारी (20 जुलै) राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला आहे (Mahayuti Ptotest For Milk Producer Farmers).

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटांत सापडला असून दुधाचे भाव 16 ते 18 रुपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठराविक दूध संघापूरतीच मर्यादित आहे. राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे, अशा भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केला आहे (Mahayuti Ptotest For Milk Producer Farmers).

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या आंदोलनातून जर काही निष्पन्न झाले नाही. तर 1 ऑगस्टला मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर आणि चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

Mahayuti Ptotest For Milk Producer Farmers

संबंधित बातम्या :

भाजप आमदाराचा प्लाझ्मादानाचा निर्धार, कोरोनामुक्त होताच घोषणा

“काँग्रेस मंत्री निष्क्रिय” पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.