AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या दुर्लक्षामुळे स्वखर्चातून उभारणार आगरी कोळी-वारकरी भवन, मनसे आमदाराची माहिती

आगरी कोळी आणि वारकरी भवनाचे भूमीपूजन 19 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या दुर्लक्षामुळे स्वखर्चातून उभारणार आगरी कोळी-वारकरी भवन, मनसे आमदाराची माहिती
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 5:50 PM

कल्याण : कल्याण (Kalyan) ग्रामीण भागातील खोणी इथं आगरी कोळी आणि वारकरी भवन (Aagri Koli Warkari Bhavan) स्वखर्चातून उभारणार असल्याची माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील आगरी साहित्यीकांनी आमदार राजू पाटील यांची आज त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ही माहिती दिली. आगरी कोळी आणि वारकरी भवनाचे भूमीपूजन 19 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. (MNS MLA Raju Patil will build Aagri Koli Warkari Bhavan at his own expense in Kalyan)

आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्याची मागणी समाज बांधवांकडून वारंवार केली जात आहे. सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्वखर्चातून हे भवन उभारण्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. साहित्यिक सर्वेश तरे, भुमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांना आगरी-कोळी बोलीला ‘राजाश्रय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली.

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतना-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ आणि ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे. आगरी-कोळी बोलीतील साहित्य निर्मीतीला प्रोत्साहन द्यावं यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबिरं राबवणे, बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्थरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे, नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मिळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे, या मागण्या यावेळी साहित्यीकांनी आामदार पाटील यांच्याकडे केल्या. (MNS MLA Raju Patil will build Aagri Koli Warkari Bhavan at his own expense in Kalyan)

या भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालयं, आगरी कोळी लोकगितांच्या रेकॉडिंगसाठी अत्याधुनिक स्टुडियो, वारकऱ्यांकरीता वास्तव्य करण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती राजू पाटील यांनी केली आहे.

इतर बातम्या –

राज्य सरकारने विद्युत कंपन्यांवर ऑडिटर नेमावा, मनसेची मागणी

लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदार राजू पाटलांचा गृहमंत्र्यांना सवाल

(MNS MLA Raju Patil will build Aagri Koli Warkari Bhavan at his own expense in Kalyan)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.