मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी
महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात येत आहे. (Mumbai BMC bans bursting of firecrackers at public places during Diwali 2020)
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आल्याने मुंबईतील मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची प्रचंड झुंबड उडाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास बंदी घातली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलबाजा, अनार फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Mumbai BMC bans bursting of firecrackers at public places during Diwali 2020)
त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवा, असेही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. दिवाळीसाठी घरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला हात, पाय आणि चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल. सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना यात नमूद करण्यात आली आहे.
?दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या मार्गदर्शक सूचना?
? फटाके फोडणे/आतशबाजीबाबत
• कोरोनाबाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो. त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.
• हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. त्या स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.
• वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.
• दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके फोडता येतील. फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.
• ‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली आपल्याजवळ बाळगू नये.
• खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण आणि पाण्याने हात नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.
• लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या / मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण आणि सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा. (Mumbai BMC bans bursting of firecrackers at public places during Diwali 2020)
?’कोविड’विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी?
• ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
• यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवावयाचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुयोग्यप्रकारे हात – पाय – चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.
• यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.
• दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे किंवा Online Video Conferencing द्याव्यात.
•भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो Online Video Conferencing ओवाळावे. तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.
• अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात – पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.
• दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे. (Mumbai BMC bans bursting of firecrackers at public places during Diwali 2020)
संबंधित बातम्या :
मुंबईकरांना ‘बेस्ट’कडून दिलासा, वाढीव वीजबिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय