मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या
मुंबईत एकूण 13 वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त 'कोरोना' पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. जी दक्षिण वॉर्डमध्ये 'कोरोना'बाधित रुग्णांची संख्या 487 वर पोहोचली आहे (Mumbai Corona Hot spot ward wise Patients)
मुंबई : एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेतीन हजाराच्या उंबरठ्यावर असल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 487 वर पोहोचली आहे. मुंबईतील सात वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत. (Mumbai Corona Hot spot ward wise Patients)
मुंबईत एकूण 13 वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 21 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. ‘जी दक्षिण’मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या वॉर्डमध्येच सर्वाधिक म्हणजे 67 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत.
वॉर्डनिहाय कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या (कंसात बरे झालेले रुग्ण)
जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 487 (67) रुग्ण बरे
ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडी बंदर – 349 (31)
जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 251 (19)
एल – चुनाभट्टी, कुर्ला – 240 (8)
एफ उत्तर– सायन, माटुंगा, वडाळा – 228 (16)
के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 223 (31)
डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 207 (32)
के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 181 (38)
एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 154 (16)
एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 149 (14)
एफ दक्षिण – परळ, शिवडी – 119 (8)
ए – कुलाबा, कफ परेड , फोर्ट – 118 (3)
एम पश्चिम – चेंबुर – 104 (13)
(Mumbai Corona Hot spot ward wise Patients)
शंभरपेक्षा कमी रुग्ण असलेले प्रभाग
पी उत्तर – 97 (16)
दक्षिण – 90 (16)
एच पश्चिम – 79 (16)
उत्तर – 76 (10)
आर मध्य – 71 (13)
पी दक्षिण – 68 (13)
बी – 58 (7)
आर मध्य – 30 (7)
टी – 23 (5)
मध्य – 23 (5)
आर उत्तर – 20 (6)
As on 21-Apr
Pl note: Ward wise figures are updated basis continuous realignment & reconciliation through the network of on-ground Medical teams.
However, these largely indicate emerging trends across Mumbai.#BlessedToServe#AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/wWKbExy5RY pic.twitter.com/AgSHxLniFj
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 21, 2020
(Mumbai Corona Hot spot ward wise Patients)