मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू
विक्रोळी भागात संबंधित डेंटिस्टचा दवाखाना होता. ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असल्याने त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai Dentist Dies of Corona)
मुंबई : ‘कोरोना व्हायरस’च्या संसर्गामुळे मुंबईत डॉक्टरला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विक्रोळीतील प्रसिद्ध डेंटिस्टचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झालं. (Mumbai Dentist Dies of Corona)
संबंधित 59 वर्षीय डॉक्टरला काही दिवसांपूर्वी ‘कोरोना’ची लक्षणं जाणवली होती. त्यांनी ‘कोरोना’ची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पवईतील रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं.
उपचार सुरु असतानाच आज (सोमवार 11 मे) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरच्या पार्थिवावर आज मुंबई महापालिकेच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रोळी भागात संबंधित डेंटिस्टचा दवाखाना होता. ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असल्याने त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोविड19 विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी कृपया आपापल्या घरीच थांबा. प्रत्यक्ष येऊन भेटण्याचा कोणीही प्रयत्न करु नका. लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करा, शोकसंदेश फक्त एसएमएस करावा, अशी विनंती डॉक्टरच्या कुटुंबाने मुंबईतील सर्व आप्त स्वकीय आणि मित्र परिवार यांना केली आहे.
VIDEO : Maharashra Corona Cases | राज्यात कोरोनाचे 22171 रुग्ण, मुंबईत बाधितांचा आकडा 13564 वरhttps://t.co/oSg8JlRm3M
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
(Mumbai Dentist Dies of Corona)