Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Mumbai Local Train may not Resume After Corona Patient Increasing)

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:58 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना कोरोनाची बाधा होत आहेत. तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Mumbai Local Train may not Resume After Corona Patient Increasing)

मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर मुंबई लोकल ही सर्वसामान्य जनतेसाठी सुरु केली, तर त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितलं जात होतं.

मात्र कोरोनाचा वाढता आकडा, लोकलमध्ये गर्दी, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसह अनेक कारणामुळे लोकलचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे.

मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या तरी, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मुंबईत काल कोरोनाचे 1092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर  1053 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 9325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ

16 नोव्हेंबर – 409 17 नोव्हेंबर – 541 18 नोव्हेंबर – 871 19 नोव्हेंबर – 924 20 नोव्हेंबर – 1031 21 नोव्हेंबर – 1092

(Mumbai Local Train may not Resume After Corona Patient Increasing)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, पाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.