सर्वसामान्य महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास, पण वेळमर्यादेचा फायदा कुणाला? महिलावर्गाचा सवाल

मुंबईतील सर्वसामान्य महिलांसाठी लोकल प्रवास आजपासून सुरु करण्यात आला आहे. पण महिलांना लोकल प्रवास करण्यासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, या वेळमर्यादेचा फायदा सामान्य महिलांना होणार नाही. त्यामुळं महिलांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्य महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास, पण वेळमर्यादेचा फायदा कुणाला? महिलावर्गाचा सवाल
mumbai local train for women
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 9:05 AM

मुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सरसकट सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सर्वसामान्य महिला लोकल प्रवास करु शकणार आहेत. पण सरकारच्या वतीनं महिलांना प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजेनंतर लोकल बंद होण्यापर्यंत प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, अनेक महिलांनी सरकारच्या वेळमर्यादेवर नाराजी व्यक्त केली आहे. (Ordinary women are allowed to local travel, but the timing is wrong )

सर्वसामान्य कामगार महिला, सफाई कर्मचारी, नोकरदार महिला वर्गाला सकाळी 10 वाजता कार्यालयात पोहोचावं लागतं. अशा महिलांना सकाळी किमान ८ वाजता घरातून निघावं लागतं. अशावेळी 11ची वेळ काय कामाची असा सवाल महिला विचारत आहेत. तसंच सरकारला जर सर्वच महिलांसाठी लोकल सुरु करायची असेल तर घालून दिलेली वेळेची मर्यादा बदलावी अशी मागणी आता महिलावर्गाकडून होताना दिसत आहे. दरम्यान वसई-विरार परिसरातील महिला सकाळी तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेल्या असता अजून कोणतीच परवानगी आली नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आल्याची तक्रार काही महिलांनी केली आहे.

मुंबईत महिलांना आजपासून लोकलने प्रवासाची मुभा

मुंबईतील सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवास करु देण्याच्या मागणीला अखेर काल यश आलं. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. विशेष म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवासास मुभा दिली आहे.

संबंधित बातम्या:

रेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

Ordinary women are allowed to local travel, but the timing is wrong

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.