23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती, ‘परळचा राजा गणेश मंडळा’चे चार स्तुत्य निर्णय
परळचा राजा गणेश मंडळाने कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक भान राखून तीन फुटांचीच गणेशमूर्ती घडवण्याचा स्तुत्य निर्णय जाहीर केला. (Paralcha Raja Ganeshotsava Mandal to celebrate simply)
मुंबई : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही ‘कोरोना’चे सावट आहे. पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला असताना मुंबईतही ‘परळचा राजा गणेश मंडळा’ने मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षी 23 फुटांऐवजी 3 फुटांच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. (Paralcha Raja Ganeshotsava Mandal to celebrate simply)
परळचा राजा गणेश मंडळाने कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक भान राखून तीन फुटांचीच गणेशमूर्ती घडवण्याचा स्तुत्य निर्णय जाहीर केला. परळचा राजा गणेशमूर्तीचे विसर्जनही कृत्रिम तलावात केले जाणार असून कुठल्याही प्रकारची विसर्जन मिरवणूकही काढायची नाही, असे मंडळाने ठरवले आहे. त्याचप्रमाणे विभागात यंदा परळच्या राजाची गणेशोत्सव वर्गणीही घेतली जाणार नाही, अशा चार घोषणाही करण्यात आल्या.
हेही वाचा : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणे, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणे, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत एकमत झाले. बाप्पाच्या मिरवणुकीबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल.
कोविड19 विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यंदा पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरुपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.
(Paralcha Raja Ganeshotsava Mandal to celebrate simply)