मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा, रेल्वेचा राज्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल
रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. (Railway granted permission to school teachers & other non-teaching staff to travel by local train services)
मुंबई : रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करताना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. (Railway granted permission to school teachers & other non-teaching staff of schools to travel by suburban train services)
On the request of Maharashtra govt, permission has been granted by Railway Ministry, to school teachers & other non-teaching staff of schools to travel by suburban train services with immediate effect. Valid identity cards are necessary for entry at stations: Western Railways PRO
— ANI (@ANI) November 13, 2020
रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासासाठी मुभा देण्याची विनंती केली होती. त्यांनी याबबत ट्विट केलं होते.
राज्य सरकारच्या वतीनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.@Central_Railway@WesternRly pic.twitter.com/YLYsGWjb5o
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 11, 2020
राज्य सरकारतर्फे 6 नोव्हेंबरला रेल्वेला पत्र लिहीले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना किशोरराजे निंबाळकर यांनी पत्र लिहीले होते. दरम्यान, महाराष्ट्रात 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांसंबधी एसओपी जारी केली आहे.
खासगी सुरक्षारक्षकांना परवानगी
भारतीय रेल्वे विभागाने आता मुंबईतील खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाला काही दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला. लोकलने प्रवास करण्यासाठी संबंधित खासगी सुरक्षारक्षकांना गणवेशात यावं लागणार आहे. तसेच आपलं मान्यताप्राप्त ओळखपत्र देखील दाखवावं लागणार आहे
सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार
सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती.
लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्राला देत रेड सिग्नल दाखवला आहे.
संबंधित बातम्या :
लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?
लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
(Railway granted permission to school teachers & other non-teaching staff of schools to travel by suburban train services)