रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (6 ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित युवतीच्या कुटुंबियांची बुलगडी या गावातील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देणार असल्याचं सांगितलं.

रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 10:22 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (6 ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित युवतीच्या कुटुंबियांची बुलगडी या गावातील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देणार असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचंही म्हटलं. (Ramdas Athawale meet victim family of Hathras rape case in Uttar Pradesh)

रिपब्लिकन पक्षातर्फे पीडित कुटुंबाला सांत्वनपर 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. पीडित दलित युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत रिपब्लिकन पक्ष या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे.

दरम्यान याआधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामदास आठवले यांना फोन करून हाथरस प्रकरणावर चर्चा केली होती.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हाथरस प्रकरणावरून रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली होती. एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी छाती बडवणाऱ्यांनी आणि नटीने हाथरसवर बोलावं. बलरामपूरवर बोलावं. या नटीसह तिच्या सर्व समर्थकांना आता हाथरसला जाण्याचं तिकीट काढून द्या, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला होता.

आठवले यांनी संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं होतं. “संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. ते दलित अत्याचारविरुद्ध कधीही पुढे आले नाहीत,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला होता.

जिथं जिथं दलित अत्याचार होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये, असंही आठवले यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

राऊतांनी विचारलं रामदास आठवले कुठेत?, आठवले मैदानात उतरुन उत्तर देणार

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

(Ramdas Athawale meet victim family of Hathras rape case in Uttar Pradesh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.