AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 10 वर्षांपासून प्रतिसाद नाही!, मुंबई महापालिकेने नागरी सत्कार गुंडाळला

जानेवारी 2010 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मुंबई महापालिकेच्यावतीनं सचिनचा नागरी सत्कार करण्याचा ठराव महापालिकेत मांडला होता. पण सचिन तेंडुलकरने गेल्या 10 वर्षात मुंबई महापालिकेला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे त्याचा नागरी सत्काराचा कार्यक्रम गुंडाळण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 10 वर्षांपासून प्रतिसाद नाही!, मुंबई महापालिकेने नागरी सत्कार गुंडाळला
| Updated on: Nov 06, 2020 | 4:15 PM
Share

मुंबई: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई महापालिकेकडून जाहीर नागरी सत्कार केला जाणार होता. पण सचिन तेंडुलकरने गेल्या 10 वर्षात मुंबई महापालिकेला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे अखेर सचिनचा नागरी सत्काराचा कार्यक्रम गुंडाळण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. (Sachin Tendulkar’s civic felicitation program canceled by Mumbai Municipal Corporation)

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत कसोटीमध्ये 51 तर एकदिवसीय सामन्यात 49 शतके केली आहेत. सचिनने एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, त्यात 34 हजार 357 धावा केल्या. सचिनच्या या कामगिरीचा सन्मान करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला होता. जानेवारी 2010 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मुंबई महापालिकेच्यावतीनं सचिनचा नागरी सत्कार करण्याचा ठराव महापालिकेत मांडला होता.

मुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांनीही विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला प्रस्ताव मंजूर केला होता. सभागृहातील ठरावानंतर फेब्रुवारी 2010 मध्ये सचिन तेंडुलकरला ठरावानुसार कल्पना देण्यात आली. महापौर आणि आयुक्तांच्या कार्यालयाकडून सचिन तेंडुलकरला वेळ देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर सचिननेही पत्र मिळाल्याचं महापालिकेला कळवलं होतं. मात्र, सत्कारासाठी दिनांक आणि वेळ नमूद केलेली नव्हती.

11 डिसेंबर 2011 रोजी सचिनला पुन्हा एकदा नागरी सत्काराबाबत कळवण्यात आलं. पण सचिनकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा सत्कारही पुढे ढकलण्यात आला. अखेर गेल्या 10 वर्षात सचिनकडून सत्कारासाठी वेळच दिली नाही. त्यामुळे अखेर हा नागरी सत्कार गुंडाळण्याचा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्याचा नागरी सत्कार करणं उचित ठरणार नाही, असं मत व्यक्त करत मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर नागरी सत्काराचा कार्यक्रम गुंडाळून ठेवला आहे.

संबंधित बातम्या:

IPL मधील खतरनाक थ्रो पाहून क्रिकेटचा देवही घाबरला, ICC ला सचिन तेंडुलकरचं खास अपील

IPL 2020 : बँगलोरवर विजय मिळवूनही पंजाबच्या संघावर सचिन तेंडुलकर संतापला

Sachin Tendulkar’s civic felicitation program canceled by Mumbai Municipal Corporation

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.