आधी मातोश्री आता वर्षा बंगला, शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत कशावर चर्चा झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (Sharad Pawar meet Uddhav Thackeray)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत कशावर चर्चा झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (Sharad Pawar meet Uddhav Thackeray). या भेटीनंतर राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. असं असलं तरी शरद पवार यांनी याआधी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट अशीच होती की वेगळी हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील होते. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. त्यामुळे त्या भेटीबद्दलही मोठी चर्चा झाली होती.
याआधी शरद पवार यांनी ठाकरे स्मारकावर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग घेत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. ही बैठक नियमीत बैठक असल्याचं आणि त्यात महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं. आर्थिक गोष्टींना चालना देण्याविषयी आणि लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यात काय शिथिलता देता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती.
दरम्यान, कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी करत लॉकडाऊनच्या पुढील टप्प्याची घोषणा केली. याला केंद्र सरकारने अनलॉक 1 असं नाव दिलं आहे. 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल. या प्रमाणे कंटेन्मेंट झोनमधील नियम जसे आहेत तसेच राहतील. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.
हा लॉकडाऊन घोषित करताना केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत.
संबंधित बातम्या :
LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी
Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार!
Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?
Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?
संबंधित व्हिडीओ :