भाजप प्रवेशाआधी रात्री सव्वा वाजता उदयनराजेंचा राजीनामा

राष्ट्रवादीचे (NCP) नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. रात्री सव्वा वाजता त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपुर्द केला.

भाजप प्रवेशाआधी रात्री सव्वा वाजता उदयनराजेंचा राजीनामा
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 8:30 AM

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे (NCP) नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. रात्री सव्वा वाजता त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपुर्द केला. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप (BJP) प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून उदयराजेंच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी वेळ घेत अखेर आपला भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

उदयनराजे भोसले राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि गिरीश महाजन हेही उपस्थित होते. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो तात्काळ मंजूर केला.

पुण्याहून जाताना उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यसभा खासदार अमर साबळे उपस्थित होते. अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एखाद्या नेत्याचा भाजप प्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी (14 सप्टेंबर) सकाळी 9 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश होईल.

उदयनराजेंकडून भाजप प्रवेशाची माहिती

“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे, आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असे ट्विट करत उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली.

उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी (12 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे लवकरच भाजपमध्ये येतील असा आशावाद पुन्हा व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.