दारु मिळाल्यानंतर आनंद लुटला, खुशी-खुशीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी धुतला
वसईत 5 जणांनी दारु पिऊन अक्षरश: धिंगाणा घातला. या मद्यपींना नशेमध्ये असताना एकमेकांना लाथा बुक्क्याही मारल्या.
वसई : दीड महिन्यांनंतर दारुची दुकानं उघडल्याने तळीरामांचा (Vasai Liquor Update) आनंद गगनात मावेनासा झाला. याच जोशाच्या भरात वसईत 5 जणांनी दारु पिऊन अक्षरश: धिंगाणा घातला. या मद्यपींना नशेमध्ये असताना एकमेकांना लाथा बुक्क्याही (Vasai Liquor Update) मारल्या.
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं बंद होती. त्यात दारुच्या दुकानांचाही समावेश होता. त्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाली. मात्र, काल (4 मे) दीड महिन्यांनी तळारामांची दारुची प्रतीक्षा संपली. दूध आणायच्या वेळेत लोकांनी दारुच्या दुकानांसमोर एक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या.
दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये दिसलीhttps://t.co/X77WMXNMud
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2020
दारुची दुकानं सकाळी 10 वाजता उघडणार होती, पण मद्यपींनी मात्र सकाळी 7 वाजल्यापासूनच अगदी शिस्तीत रांगा लावल्या. एकदाचे 10 वाजले आणि एकदाची दारुची बाटली (Vasai Liquor Update) हातात पडली. दारु म्हणजे जीव की प्राण झाली.
दारुची दुकानं उघडताच दीड महिना निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसायला लागली. पण, वसईच्या साईनगर मैदानाजवळ दारुचा ‘रिझल्ट’ ही पाहायला मिळाला. इथे देशी दारु पिऊन 5 जणांनी भर रस्त्यात धिंगाणा घातला. एकमेकाला पकडून लाथा बुक्क्याही मारल्या. ‘पोटात पडली बायजाबाई आणि आमची नशा ही एकच घाई’, असेच एकप्रकारे वातावरण तिथं दिसून (Vasai Liquor Update) आलं.
संबंधित बातम्या :
Corona : विक्रोळीत माजी नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू
दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये
हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर
मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित