Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?

100 कोटी लसीकरणामध्ये जवळपास 71 कोटी लोकांना पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 29 कोटी लोकांनाच दोनही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि अनेक तज्ञांने भारतात तिसऱ्या काटेचा धोका व्यक्त केला आहे आणि तो धोका टळलेला नाही. 

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?
Covid
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 9:08 PM

मुंबईः भारताने जरी 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरीही कोरोना महामारी काही संपलेली नाही. या 100 कोटी लसीकरणामध्ये जवळपास 71 कोटी लोकांना पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 29 कोटी लोकांनाच दोनही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि अनेक तज्ज्ञांनी भारतात तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे आणि तो धोका टळलेला नाही.  भारतात तिसरी लाट आलीच तर ती दुसऱ्या लाटेसारखी भयावह असणार नाही, जर नवीन वेरिएंट आला नाही तर, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जिथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता रुग्णसंख्या वाढली आहे. (100 crore covid vaccination done but third wave danger still exists)

भारतात सध्याची आकडेवारी

शनिवारी भारतात 16,326 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता पर्यंत भारतात एकूण 3,41,59,56 रुग्णांची संख्या झाली आहे आणि आता सक्रिय रुगण 1,73,738 अहेत जे मागच्या 233 दिवसांसधील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मृत्यूंचा आकडा 4,53,708 झाला आहे ज्यात काल 666 मृत्यूंची नोंद झाली. कोरोना रूणांची संख्या मागच्या 29 दिवसांपीसून प्रतिदिन 30,000 पेक्षा कमी नोंद होत आहे आणि मागच्या सलग 118 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णांची नोंद 50,000 पेक्षा कमी आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ही एकूण रूणांमध्ये फक्त 0.51  टक्के आहे जी मार्च २०२० पासून सर्वात कमी आहे. रूगण बरे होण्याची टक्केवारी आता 98.16 आहे जी मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे, केंद्रीय आरोग्य विभागाने ही आकडेवारी दिली आहे. मागच्या 24 तासांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या देखील 2,017 ने कमी झाली आहे.

ब्रिटेन, चीन सारख्या देशात रुग्ण वाढ

भारतामध्ये कोरोनाची नवीन लाट आली तर ती दुसऱ्या लाटे एवढी भयावह नसेल जर नवीन वेरीएंट नाही आला तर. मात्र सद्ध्याचे कोरोना रुगणांचे आकडे कमी आहे म्हणून नवीन लाट येणारच नाही आसं नाही, आसं तज्ज्ञांनी सांगितले आहे. देशात आता दिवाळी सारखे मोठे सणवार येत आहेत त्यामूळे रुगणांची संख्या वाढण्याची भिती आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जीथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता नवीन कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढली आहे. हे नवीन रुग्ण वायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचे असल्याचे मानलं जात आहे.

भारतात लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला म्हणून देश साजरा करत आहे पण अजून वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे आणि सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

इतर बातम्या

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क

ब्लॅक फंगसने महिलेचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, खचलेल्या निवृत्त जवानाने तीन मुलांना विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं

Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

(100 crore covid vaccination done but third wave danger still exists)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.