Jammu Kashmir : कश्मिरमध्ये 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्‍यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत.

Jammu Kashmir : कश्मिरमध्ये 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर
file photo Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:22 AM

श्रीनगर : देशात अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दहशतवादी(Terrorist) अधूनमधून डोके वर काढीत आहेत. देशाचा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन(Republic Day) एक दिवसावर आला असतानाच दहशतवादी कारवायांचीही भिती सतावत आहे. पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी सक्रीय बनले असून त्यांच्याकडून घुसखोरी करून हल्ला घडवला जाण्याची भिती गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. याची बीएसएफ(BSF)सह सर्वच सुरक्षा दलां(Security Fource)नी गंभीर दखल घेतली आहे. हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा बलचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. या दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर आहे. (135 terrorists preparing to infiltrate Kashmir, BSF on alert mode)

पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले दहशतवादी

मागील वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर एलओसीवर शांतता आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्‍यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली व इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे महानिरीक्षक सिंह यांनी सोमवारी बीएसएफ मुख्यालयातील वार्षिक संमेलनात बोलताना सांगितले.

ठाण्यातील पोलीस स्कूलला धमकीचा फोन

ठाण्यातील पोलीस स्कूलला रविवारी एक धमकीचा मेल आला आहे. जिहाद 2022 या मेलवरुन हा धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. या मेलचा सायबर पोलीस सखोल तपास करीत आहेत.

दिल्लीतही सुरक्षेत वाढ

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील 27 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटर्स, हँग ग्लाईडर, मानवरहित एरियल वाहन हवेत उडविण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दहशतवाद्यांकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. (135 terrorists preparing to infiltrate Kashmir, BSF on alert mode)

इतर बातम्या

Delhi Crime : भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट; वाचा सविस्तर प्रकरण

Assembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.