ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा आणि महाविद्यालय बंद (PUBG game addiction) आहेत.
चंदीगड (पंजाब) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा आणि महाविद्यालय बंद (PUBG game addiction) आहेत. या दरम्यान मुलांमध्ये PUBG गेमची क्रेझ वाढली आहे. अनेकजण आपल्या रिकाम्या वेळेत PUBG गेम खेळत आहेत. या गेममुळे पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये 17 वर्षाच्या एका मुलाने आपल्या वडिलांनी साठवलेले 16 लाख रुपये PUBG गेमसाठी खर्च केले (PUBG game addiction) आहेत. घरच्यांनी ऑनलाईन अभ्यासासाठी मुलाला मोबाईल दिला होता.
वडिलांनी जमा केलेले 16 लाख मुलाने PUBG गेममध्ये खर्च केल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाकडे तीन बँकेंच्या अकाऊंटचा अॅक्सेस होता. ज्याचा उपयोग तो PUBG गेम मोबाईलमध्ये अपग्रेड करण्यासाठी वापरत होता. त्यासोबत तो आपल्या मित्रांचेही अॅप विकत आणि अपग्रेड करत होता. कुटुंबाला या घटनेची माहिती बँकेच्या ट्रान्जेक्शनमधून समजली. मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत.
“मुलगा सर्व ट्रान्जेक्शन आपल्या आईच्या मोबाईलवरुन करत होता आणि बँक रीलेटेड सर्व मेसेज डिलिट करत होता”, असं मुलाच्या वडिलांनी सांगितले.
मुलाच्या कुटुंबियांना वाटत होत की, त्यांचा मुलगा स्मार्टफोनचा सर्वाधिक उपयोग आपल्या ऑनलाईन अभ्यासासाठी करत आहे. पण आता या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलाला मोबाईल रिपेअरिंग दुकानावर कामाला लावले आहे. जेणेकरुन तो मोबाईलवर PUBG गेम खेळू शकणार नाही.
“मी त्याला घरी रिकामे बसू देणार नाही आणि अभ्यासासाठी मोबाईल फोनही देणार नाही”, असं मुलाच्या वडिलांनी सांगितले.
यापूर्वीही PUBG गेमच्या अॅडिक्शनने अनेक घटना घडल्या आहेत. बऱ्याचदा हा गेम बॅन करा अशी मागणी अनेकांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले
PUBG चा नाद सोडवण्यासाठी बापाने पोराला शूटर बनवलं, आज ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं