फ्रान्समधून अजून 3 राफेल भारताच्या दिशेनं झेपावले, रात्री उशिरा पोहोचणार

फ्रान्समधून 3 राफेल लढाऊ विमान बुधवारी रात्री 10.30 वाजता जामनगर एअरबेसवर उतरणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

फ्रान्समधून अजून 3 राफेल भारताच्या दिशेनं झेपावले, रात्री उशिरा पोहोचणार
3 राफेल लढाऊ विमानांचं फ्रान्समधून उड्डाण
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:45 PM

मुंबई : भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार आहे. फ्रान्समधून 3 राफेल लढाऊ विमान बुधवारी रात्री 10.30 वाजता जामनगर एअरबेसवर उतरणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. राफेल विमानांचा नवा ताफा भारतात दाखल झाल्यानंतर भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार आहे. (3 Rafale fighter jets take off from France, arriving in India late at night)

भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सध्या 11 राफेल विमानं आहेत. आता 3 विमाने दाखल झाल्यानंतर ही संख्या 14 होणार आहे. भारताला पुढील काही दिवसात अजून 10 राफेल विमानं मिळणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सध्या असलेले 11 राफेल विमान अंबालामध्ये 17 स्क्वॉड्रनसोबत उड्डाण भरत आहेत. राफेल विमानांना चीनसोबत सुरु झालेल्या वादावेळी पूर्व लडाख आणि अन्य मोर्चांवर गस्तीसाठी तैनात करण्यात आलं होतं.

भारत आता स्वरेशी रुपानं विकसित स्टेल्थ फायटर्स एडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसह 114 मल्टीरोल लढाऊ विमानांची ऑर्डर देणार आहे.

भारतीय वायू सेनेची ताकद वाढणार

चीनसोबत सुरु असलेल्या सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेची ताकद वाढणार आहे. आज तीन राफेल लढाऊ विमान रात्री उशिरा एअरबेसवर लँड करणार आहेत.

7 हजार किलोमीटरचं अंतर कापून राफेल भारतात पोहोचणार

हे तीन लढाऊ राफेल फ्रान्सवरुन भारतात 7 हजार किलोमीटर अंतर कापून येणार आहेत. UAEच्या आकाशातच या तिनही विमानांमध्ये इंधन भरलं जाणार आहे.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

  • राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान
  • लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती
  • हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता
  • हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता

संबंधित बातम्या :

Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

3 Rafale fighter jets take off from France, arriving in India late at night

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.