या प्रसिद्ध मशिदीतच वाजली ‘जय श्रीराम’ची रिंगटोन; या प्रकरणी इतक्या जणांना झाली अटक
या घटनेनंतर मशिदीबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला होता. आरोपीच्या वकिलाने नामपल्ली फौजदारी न्यायालय संकुलाबाहेर पत्रकारांना सांगितले की, कोर्टाने निरीक्षण केले की फिर्यादी आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे.
हैदराबाद : महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणावरून राजकारण पेटवले होते. त्यानंतर काही किरकोळ घटना वगळता मशिदीवरील भोंग्यांचा गोंधळ कमी झाला होता. मात्र आता हैदराबादच्या प्रसिद्ध मक्का मशिदीत जय श्री राम हे गाणं वाजवल्याचं प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून 3 तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनीही दारू पिल्याचे सांगण्यात येत आहे. खरे तर प्रकरण चारमिनार येथील मक्का मशिदीचे आहे. येथे तीन तरुण मशिदीत आले होते,
ते मशिदीच्या आवारात असताना त्यांच्यापैकी एकाच्या फोनमध्ये जय श्री रामचे गाणे वाजू लागले. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनीही दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले.
डीसीपी साउथ झोन हैदराबाद साई चैतन्य यांनी सांगितले की, संध्याकाळी तीन तरुण फिरत असताना मक्का मशिदीत आले होते. त्यावेळी एका तरुणाच्या फोनवर ‘जय श्री राम’ अशी रिंगटोन वाजली होती.
तर तिघेही मशिदीच्या आवारात असताना त्या तरुणाचा फोन आल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून जय श्री रामची रिंगटोन ऐकू येत होती. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिले. तिघेही दारुच्या व्यसनात गुरफटून गेले आहेत. त्यामुळे पोलीस ते पुन्हा शुद्धीत येण्याची वाट पाहत होते.
त्यानंतरच तो मशिदीत का आला होता, याचा तपास करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रसिद्ध चारमिनारजवळील मक्का मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी 18 मे 2007 रोजी झालेल्या स्फोटात नऊ जण ठार आणि 58 जखमी झाले होते.
या घटनेनंतर मशिदीबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला होता. आरोपीच्या वकिलाने नामपल्ली फौजदारी न्यायालय संकुलाबाहेर पत्रकारांना सांगितले की, कोर्टाने निरीक्षण केले की फिर्यादी आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे.