333 रुपयाच्या चेकचा 90 लाखात लिलाव, जाणून घ्या काय होते त्यामध्ये इतके खास
ऍपलच्या अनेक गोष्टींचा बऱ्याचदा लिलाव केला जातो. ज्यामध्ये आयफोनचा देखील समावेश आहे. आता आणखी एका चेकचा लिलाव केला गेला आहे. जो ऍपलशी संबंधित आहे. या चेकचा लिलाव करणाऱ्या कंपनीला देखील अपेक्षा नव्हती की हा चेक इतका महाग विकला जाईल.

मुंबई : ऍपलच्या जुन्या उत्पादनांचा अनेक वेळा लिलाव केला जातो. कधी पॅकबंद आयफोनचा लिलाव होतो, तर कधी मॅकचा, पण यावेळी स्टीव्ह जॉब्सच्या स्वाक्षरीचा चेकचा लिलाव झाला आहे. या चेकला लाखो रुपयांना खरेदी केले गेले आहे. 4.01 डॉलर्स (सुमारे 333 रुपये) मध्ये स्वाक्षरी केलेला हा चेक चक्क ९० लाखांना विकला गेला आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी खूप कमी लोकांना दिले ऑटोग्राफ
ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्सबद्दल असे म्हटले गेले होते की त्यांनी क्वचितच कोणाला ऑटोग्राफ दिले आहे. त्यामुळेच आज त्यांची स्वाक्षरी लाखो रुपयांची आहे. नुकताच त्यांनी स्वाक्षरी केलेल्या धनादेशाचा लिलाव होत आहे. या चेकचा $106,985 (अंदाजे रु 89,18,628) मध्ये लिलाव झाला आहे. लिलाव करणाऱ्यांना असे वाटत होते की, हा लिलाव 25 हजार डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो, ज्याची भारतीय रुपयात किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. पण त्यापेक्षा ही जास्त त्याला किंमत मिळाली आहे.
हा चेक 23 जुलै 1976 चा आहे, जो ऍपल कॉम्प्युटर कंपनीने जारी केला आहे. त्यावर स्टीव्ह जॉब्सची सही आहे. या चेकचा अमेरिकेतील आरआर ऑक्शन फर्मद्वारे लिलाव केला जात आहे. हा चेक $4.01 (अंदाजे रु. 333) रुपयांचा आहे.
स्वाक्षरी कधी झाली?
ऑक्शन हाऊसनुसार, जॉब्स आणि अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक अॅपल-1 वर काम करत असताना या चेकवर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 50 संगणक तयार केले जात होते. हे संगणक कॅलिफोर्नियाच्या बाइट शॉपला विकले गेले होते.
ऍपल 1 हे पर्सनल कॉम्प्युटरच्या जगात खूप महत्वाचे मानले जाते. येथूनच अॅपलच्या भविष्याला वेगळे वळण लागले. या चेकबाबत, लिलाव करणार्या फर्मने म्हटले आहे की तो ऍपल कॉम्प्युटर कंपनीने जारी केला आहे.
हा चेक 23 जुलै 1976 चा आहे. हा धनादेश रेडिओ शॅकला देण्यात आला. या चेकमधील Apple चा पहिला अधिकृत पत्ता ‘770 Welch Rd., Ste. 154, Palo Alto’ आहे.
जर आपण इतिहास पाहिला तर, या चेकवर स्वाक्षरी होण्याच्या काही दिवस आधी ऍपलची स्थापना झाली होती. हा चेक रेडिओ शॅकला जारी करण्यात आला होता, ज्याने ऍपल संगणक प्रणालीच्या विकासात मोठी भूमिका बजावली होती.