40 लाख कॅश, 2 किलो सोनं, 60 महागडी घड्याळं… बड्या अधिकाऱ्याच्या घरी पहाटेच छापेमारी, सापडली 100 कोटी संपत्ती

तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बाळकृष्ण यांच्या अनेक जागांवर एकाच वेळी छापे टाकले.त्यामध्ये मिळालेली संपत्ती पाहून डोकं चक्रवायचं बाकी होतं

40 लाख कॅश, 2 किलो सोनं, 60 महागडी घड्याळं... बड्या अधिकाऱ्याच्या घरी पहाटेच छापेमारी, सापडली 100 कोटी संपत्ती
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 9:08 AM

हैदराबाद | 25 जानेवारी 2024 : तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बाळकृष्ण यांच्या अनेक जागांवर एकाच वेळी छापे टाकले. बाळकृष्ण यांनी यापूर्वी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून काम केले होते. त्यामध्ये मिळालेली संपत्ती पाहून डोकं चक्रवायचं बाकी होतं. त्यांच्या घरातून जवळपास 40 लाख कॅश, 2 किलो सोनं, 60 महागडी घड्याळं आणि कित्येक कोटींची संपत्ती समोर आली आहे.

14 टीम दिवसभर करत होत्या काम

लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेच्या 14 टीमम्सच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकून दिवसभर शोध सुरू ठेवला. गुरूवारी देखील हे छापे सुरूच राहतील, अशी माहिती मिळत आहे. बालकृष्ण यांचे घर, कार्यालय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली..

बँक लॉकर्स अजूनही उघडले नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात आत्तापर्यंत 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोनं, 60 महागडी घड्याळं, 14 मोबाइल फोन आणि 10 लॅपटॉप आत्तापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. मात्र ही फक्त घर आणि कार्यालय, तसेच नातेवाईकांच्या घरातून मिळालेली संपत्ती आहे. बाळकृष्ण यांच्या बँक लॉकर्सना एसीबीच्या पथकाने अजून हातही लावलेला नसून त्यांच्या नावे चार लॉकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी ही लॉकर्स उघडली जाऊ शकतात. दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांना बाळकृष्ण यांच्या निवासस्थानी कॅश मोजण्याचे यंत्रही सापडले आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बरीच संपत्ती गोळा केली. सध्या सुरू असलेल्या शोधात आणखी बरीच मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.