भयकंर, 485 अश्लील व्हिडीओ, 85 महिलांना दिला त्रास, मजेसाठी करत होता ब्लॅकमेल
फेसबुकवर फोटो टाकत असाल तर, ही बातमी आवर्जून वाचाच
फरीदाबाद – फेसबुक अकाऊंटवरील (face book account)महिलांचे फोटो डाऊनलोड करण्याचा घाणेरडा छंद एका 42 वर्षीय ट्रक ड्रायव्हरला (truck driver)होता. तो केवळ हे फोटो डाऊनलोड करीत नसे, तर त्या फोटोंशी छेडछाडही करीत असे. हे आपत्तीजनक फोटो नंतर तो त्या महिलांना फेसबुक मेसेंजरवर पाठवीत असे. त्यानंतर या फोटोंच्या आधारे तो त्यांना ब्लॅकमेल (blackmail)करीत असे. ज्या महिला या त्याच्या मेसेजला घाबरत असत, त्यांना फोटो व्हायरल करण्याची धमकी देून तो त्यांचा मोबाईल नंबर मागून घेत असे.
त्यानंतर धमकी देऊन त्यांना न्यूड व्हिडीओ कॉल करायला हा ट्रक ड्रायव्हर लावीत असे. अशा प्रकाराने त्याने आत्तापर्यंत 85 महिलांना ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजून काही महिला त्याच्या निशाण्यावर होत्या. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून अशा 485 आपत्तीजनक व्हिडीओ क्लीप जप्त करण्यात आल्या आहेत. यासह मेसेंजरवर 60 महिलांशी तर व्हॉट्सअपवर 25 महिलांशी चॅटही मिळाले आहेत.
सुमारे 4 महिने या आरोपीला फरीदाबाद पोलीस उ. प्रदेश आणि राजस्थानात शोधत होती. त्याला अटक करण्यात आल्यानंतर महिला इन्सेक्टर माया यांनी सांगितले आहे की या आरोपीचे नाव गणेश असे आहे. त्याच्या विरोधात आयटी कायद्यांतरग्त गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कसा सापडला आरोपी?
या प्रकरणात एक महिला पुढे आल्याने या आरोपीचा शोध लागला आहे. 6 मे रोजी या महिलेच्या व्हॉट्स्पवर तिचा एक अश्लील फोटो आला होता. तो एडिट करुन तयार करण्यात आला होता. फोन ब्ल़ॉक केला तर हा फोटो व्हायरल करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. तिने याची माहिती तिच्या नवऱ्याला दिली. या नंबरवर फोन केला तर तो स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली.
कसा करत असे महिलांचा शोध?
तो सातत्याने फोसबुकवर महिलांचे प्रोफाईल फोटो चेक करीत असे. त्यानंतर न्यूड फोटोत तो एडिट करुन अश्लील फोटो तयार करीत असे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 16 जिल्ह्यांत छापेमारी केली होती. अखेरीस 4 महिन्यांनी आरोपी गणेश पोलिसांच्या हाती लागला आहे.
आत्महत्येचा विचार करीत महिला
या आरोपीमुळे पीडित असलेल्या महिलांशी जेव्हा पोलिसांनी संपर्क केला तेव्हा त्या रडकुंडीला आल्या होत्या. त्यातील अनेक महिलांना तर प्राण द्यावे असे वाटत असे. बदनामी होण्याच्या भीतीने त्या पोलिसांकडे तक्रारही करीत नसत. मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडीओ इंटरनेटवरुन किंना ब्लॅकमेल करुन मागवलेले होते. हे सीम कार्ड राजस्थानच्या एका ढाब्याजवळ सापडल्याचे सांगत आरोपी सुटण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आता पोलिसांनी त्याला आता रिमांडमध्ये घेतले आहे.
60महिलांशी अश्लील चॅट
त्याच्या मोबाईलमध्ये 60 महिलांशी त्याने अभद्र आणि अश्लील भाषेत फेसबुक मेसेंजरवर चॅटिंग केल्याचे समोर आले आहे. त्याच्या व्हॉट्सअपवर 25 महिलांना केलेले मेसेज सापडले आहेत. हे सगळे तो पैसे मिळवण्यासाठी नव्हे ते मजा किंवा टाईमपास म्हणून करीत असे असेही त्याने सांगितले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.