शेतात सापडल्या 500 वर्षांपूर्वीच्या मूर्ती, दोन दिवसांत भक्तांची गर्दी आणि 35 हजारांच्या देणग्या, अखेरीस डिलिव्हरी बॉयने केला भांडाफोड

या घटनेचे फोटो सेशल मीडियावरही व्हायरल झाले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे फोटो डिलिव्हरी देणाऱ्या गोरेलाल यांनी पाहिल्या. त्यानंतर गोरेलाल यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी सांगितले की या मूर्ती ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या. या मूर्ती गोरेलाल यानेच आरोपी अशोककडे पोहचवल्याचे त्याने पोलीस स्टेशनमध्ये सांगितले.

शेतात सापडल्या 500 वर्षांपूर्वीच्या मूर्ती, दोन दिवसांत भक्तांची गर्दी आणि 35 हजारांच्या देणग्या, अखेरीस डिलिव्हरी बॉयने केला भांडाफोड
श्रद्धेचा बाजार Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 5:14 PM

उन्नाव – श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा पगडा आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहे. यात अनेकजण या श्रद्धेचाच फायदा घेत, लोकांची फसवणूक रीत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबातील मुलांनी आणि बापाने श्रद्धेच्या बाजाराचा कसा गैरफायदा घेतला याची ही कहाणी आहे. या घरातील मुलांनी देवी देवतांच्या मूर्ती ऑनलाईन (online purchase) मागवल्या. त्या त्यांनी गुपचूप आपल्या शेतात नेऊन पुरल्या. काही वेळाने गावातील काही जणांना सोबत घेऊन ते शेतात गेले. शेतात खोदकाम करायचे आहे, असे सांगण्यात आले. खोदकाम करताना या लपवलेल्या मूर्ती समोर आल्या. या मूर्ती 500 वर्षे (500 years old )जुन्या असल्याचे गावातील लोकांना या बाप लेकरांनी पटवून दिले. बघता बघता ही बातमी गावात पसरली, पंचक्रोशीतही पसरली. या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची (devotees)रीघ लागली.

आजूबाजूच्या शेतांतून, गावातून हजारो जण या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागला. हे भक्त या मूर्तीची पूजा करु लागले. काही जणांनी हार-फुले आणली. दोन दिवसांत या मूर्तीसमोरच्या दावनपेटीत 35 हजार रुपये जमा झाले. पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्यानंतर कारवाई करण्यात आली. यात आरोपी अशोक कुमार आणि त्याच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात महमूदपूर गावात हा प्रकार समोर आला आहे.

दोन दिवसांत दानपेटीत 35 हजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांत मूर्तीला वाहण्यासाठी पळे, फुले, नारळ तर आलेच, त्याचबरोबर 35 हजार रुपयांच्या देणग्याही मिळाल्यात. हे सारे सोंग पैसे कमवण्यासाठी केल्याचे या बाप लेकरांनी कबूल केले आहे.

हे सुद्धा वाचा

पुरात्तव विभागाचे अधिकाऱ्यांपर्यंत बातमी

शेतात पिवळ्या धातूच्या जुन्या देवतांच्या मूर्ती सापडल्याची बातमी कर्णोपकर्णी पसरली. पोलिसांनाही ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रमुखही या शेतात पोहचले. त्यांनी पुरातत्व विभागाला या मूर्तींबाबत माहिती दिली आणि या मूर्ती आरोपी अशोक कुमार याच्या घरी ठेवण्यास सांगितले.

पोलीस गेल्यानंतर मूर्ती पुन्हा आणल्या शेतात

पोलिसांनी या मूर्ती आरोपी अशोककुमारच्या घरी हसलव्या होत्या. मात्र ते गेल्यानंतर अशोककुमारची मुले रवी आणि विजय गौतम यांनी या मूर्ती आणून पुन्हा शेतात ठेवल्या. पिता आणि दोन्ही पुत्र प्रसादाची दुकाने लावून बसून राहिले. परिसरातील लोकं येऊ लागल्यावंत त्यंना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आणि गर्दी पाहून पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला.

डिलिव्हरी बॉयने केला भांडाफोड

या घटनेचे फोटो सेशल मीडियावरही व्हायरल झाले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे फोटो डिलिव्हरी देणाऱ्या गोरेलाल यांनी पाहिल्या. त्यानंतर गोरेलाल यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी सांगितले की या मूर्ती ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या. या मूर्ती गोरेलाल यानेच आरोपी अशोककडे पोहचवल्याचे त्याने पोलीस स्टेशनमध्ये सांगितले. अशोकचा मुलगा रवी गौतमने मीशू कंपनीकडून 169 रुपयांना या मूर्तींचा सेट ऑनलाईन ऑर्डर करुन मागवला होता. 29 ऑगस्टला ही डिलिव्हरी करण्यात आल्याचेही त्याने सांगितले. या डिलिव्हरीच्या पावत्याही पोलिसांना देण्यात आल्या.

आरोपी पिता-पुत्रांना अटक

हे सगळे पाहिल्यानंतर पोलीस कामाला लागले. त्यांनी अशोककुमार, मुले रवी गौतम आणि विजय गौतम यांना अटक केली आहे. हे तिघेही जण श्रद्धेचा बाजार करीत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....