लिथियमच्या साठ्यांमुळे भारताचे नशीब बदलणार? इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार?

जगातील लिथियम साठ्याच्या बाबतीत चिली 9.3 दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

लिथियमच्या साठ्यांमुळे भारताचे नशीब बदलणार? इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार?
सोने व लिथियमचे साठे
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 12:54 PM

नवी दिल्ली : देशातील 11 राज्यात खनिजांचा मोठा साठा मिळाला आहे. या साठ्यात भारताला आतापर्यंत 100 टक्के आयात करावे लागणारे लिथियमचाही समावेश आहे. तसेच देशात सोन्याचाही साठा (lithium and gold)मिळाला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने राज्य सरकार आणि कोळसा मंत्रालयाला ही माहिती दिली आहे. देशातील 51 ब्लॉक मोठ्या प्रमाणावर खनिजांचा साठा (lithium and gold)सापडला आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरात सापडलेल्या लिथियमचा समावेश आहे. या राज्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

जगभरात लिथियम किती महत्वाचा

जगातील लिथियम साठ्याच्या बाबतीत चिली 9.3 दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना 27 दशलक्ष टन साठ्यासह चौथ्या, चीन 2 दशलक्ष टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका 1 दशलक्ष टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे.

हे सुद्धा वाचा

फक्त लिथियमचा साठा मिळवून लिथियम आयन बॅटरी बनवणे सोपे होणार नाही. लिथियमचे उत्पादन आणि शुद्धीकरण हे खूप कठीण काम आहे. कारण चिलीमध्ये 9.3 दशलक्ष टन साठा असूनही केवळ 0.39 दशलक्ष टन उत्पादन होऊ शकते. ऑस्ट्रेलियात लिथियम 63 लक्ष टन साठा पण उत्पादन 0.6 दशलक्ष टन आहे. म्हणजेच मिळालेल्या साठ्यातून उत्पादन करणे भारतासाठी सोपे नाही. भारत जर लिथियमचा वापर करण्यात सक्षम झाला तर देशांतर्गत बाजारपेठेत लिथियम-आयन बॅटरीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.

बॅटरी स्वस्त होणार का?

भारताने आपल्या साठ्यातून लिथियम तयार करण्यात यश मिळवले तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. यामुळे इलेक्ट्रिक बॅटरी स्वस्त होऊ शकतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक कार अधिक स्वस्त होतील. वास्तविक, इलेक्ट्रिक कारच्या किंमतीपैकी सुमारे 45 टक्के बॅटरीचा खर्च असतो. उदाहरणार्थ, Nexon EV मध्ये बसवलेल्या बॅटरी पॅकची किंमत 7 लाख रुपये आहे, तर त्याची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे.

बॅटरीचे उत्पादन वाढवणे आवश्यक

2030 पर्यंत भारतातील 30% खाजगी कार, 70% व्यावसायिक वाहने आणि 80% दुचाकी इलेक्ट्रिक बनवण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. साहजिकच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतात लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. पण केवळ लिथियमचा साठा मिळवून हे शक्य होणार नाही. यासाठी बॅटरी निर्मितीमध्ये लिथियमचा वापर करणे आवश्यक आहे. भारतात चीनकडून सर्वात जास्त बॅटऱ्या आयात होतात.

अमेरिकेनंतर भारत हा लिथियम आयन बॅटरीचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सर्वाधिक बॅटरी चीन, जपान आणि व्हिएतनाममधून आयात केली जातात. आता या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला एक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, जेणेकरून ते देशात लिथियम आयन बॅटरी तयार करू शकतील. 2030 चे लक्ष्य लक्षात घेता, भारताला दरवर्षी 10 दशलक्ष लिथियम आयन बॅटऱ्यांचे उत्पादन करावे लागणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.