आता तुम्ही 5जीच्या युगात; नो बफरिंग, नो फ्रिजिंग, अख्खा सिनेमा काही सेकंदात डाऊनलोड करा; मोदी है तो मुमकिन है!

स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कोणत्याही व्यत्ययाशिवाय, कोणत्याही बफरिंग शिवाय दिसणार आहे. अवघ्या सेकंदात 1 ते 2 जीबीचा अख्खा सिनेमा डाऊनलोड करता येणार आहे.

आता तुम्ही 5जीच्या युगात; नो बफरिंग, नो फ्रिजिंग, अख्खा सिनेमा काही सेकंदात डाऊनलोड करा; मोदी है तो मुमकिन है!
अख्खा सिनेमा काही सेकंदात डाऊनलोड करा; मोदी है तो मुमकिन है!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 12:54 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसचं (IMC 2022) उद्घाटन केलं. यावेळी मोदींच्या हस्ते 5जी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील जनतेला हायस्पीड इंटरनेट (internet) मिळणार आहे. 5 जी सर्व्हिसमध्ये देशातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या नेटवर्क प्रोव्हाइडर करण्यात आघाडीवर आहेत. 5जी सर्व्हिसचे (5G Network) रिचार्ज प्लान 4जीच्या तुलनेत महागडे असतील असं या कंपन्यांनी जाहीर केलं आहे. 5जी सेवेमुळे अख्खा सिनेमा अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येणार आहे. या सेवेमुळे आजच्या जनरेशनचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे.

नेटवर्क किती बदणार?

5जी हे पाचव्या जनरेशनचं वायरलेस नेटवर्क आहे. जगातील अनेक देशात आधीपासूनच हे नेटवर्क आहे. विद्यमान 4जी एलटीईपेक्षा हे नेटवर्क अधिक वेगवान आहे. 5जी नेटवर्क तीन बँडसद्वारे काम करणार आहे. एक म्हणजे लो बँड, मिड आणि हाय फ्रिक्वेन्सी बँड स्पेक्ट्रम. म्हणजेच या नेटवर्कचा तीन प्रकारे परिणाम दिसून येणार आहे.

पहिला परिणाम हा हाय स्पीड डाऊनलोडिंगचा असेल. दुसरा अत्यंत चांगल्या कम्युनिकेशनच्या रुपात असेल तर तिसरा परिणाम हा इंटरनेटशी संबंधित सर्व्हिसेजमध्ये स्पीडमुळे होणाऱ्या त्रुटी दूर करणारा असेल.

हे सुद्धा वाचा

5Gची स्पीड किती असेल?

वायरलेस इंडस्ट्री ट्रेड ग्रुपच्या (GSMA) म्हणण्यानुसार, 5जी नेटवर्कची इंटरनेटची स्पीड ही 4जीच्या स्पीडपेक्षा दहापट अधिक आहे. म्हणजे 4जीची इंटरनेट स्पीड 100 मेगाबाईट प्रति सेकंद आहे. तर 5जीची इंटरनेट स्पीड ही प्रति सेकंद 10 गीगाबाईट (GBPS) असणार आहे.

लोकांचं जगणच बदलणार?

5जी नेटवर्क प्रमाणे लोकांचं आयुष्यही बदलणार आहे. पहिला बदल पर्सनल लेव्हला दिसून येणार आहे. या स्पीडमुळे व्हिडीओ कॉलचा स्पीड अधिक चांगला होणार आहे.

स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कोणत्याही व्यत्ययाशिवाय, कोणत्याही बफरिंग शिवाय दिसणार आहे. अवघ्या सेकंदात 1 ते 2 जीबीचा अख्खा सिनेमा डाऊनलोड करता येणार आहे.

ई-हेल्थ, टेलिमेडिसीन, शिक्षण, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या क्षेत्रातही क्रांती होणार आहे. याच्याशी संबंधित सुविधा अधिक तेज होणार आहेत. व्हिडिओ गेमिंगच्या क्षेत्रातही बदल होणार आहे.

व्हर्च्युअल रिअॅलिटीचं जग अधिकच जवळ येणार आहे. ड्रायव्हरलेस कार आणि ड्रायव्हरलेस मेट्रो चालवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

या शहरात मिळणार 5जी सेवा

दिल्ली मुंबई अहमदाबाद बेंगळूरू चंदीगड चेन्नई गांधीनगर गुरुग्राम हैदराबाद कोलकाता जामनगर लखनऊ पुणे

या देशात आहे 5G नेटवर्क

5जी नेटवर्क सेवेत मलेशिया सर्वात आघाडीवर असल्याचं ओपन सिग्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मलेशियात इंटरनेटची स्पीड सरासरी 50.3 Mbps आहे. त्यानंतर स्वीडनचा नंबर लागतो. स्वीडनमध्ये इंटरनेटची स्पीड 43.7 Mbps आहे. त्यानंतर नॉर्वे, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरियाचा नंबर लागतो.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.