Param Vir Chakra : 72 तासांचे प्रयत्न; भारतीय रणगाडे आणि सैनिकांसाठी मार्ग मोकळा करणारे कोण आहेत परमवीर चक्राने सन्मानित राम राघोबा राणे

21 जून 1950 रोजी सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यापूर्वी काही महिने त्यांना लेफ्टनंट बनवण्यात आले होते. 1954 मध्ये कॅप्टन करण्यात आले. राणे 25 जानेवारी 1968 रोजी मेजर म्हणून ते निवृत्त झाले. 1994 मध्ये पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

Param Vir Chakra : 72 तासांचे प्रयत्न; भारतीय रणगाडे आणि सैनिकांसाठी मार्ग मोकळा करणारे कोण आहेत परमवीर चक्राने सन्मानित राम राघोबा राणे
राम राघोबा राणे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 5:13 PM

Param Vir Chakra : देशाचे संरक्षण करावे, त्यासाठी लष्करात (Army) भरती व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते. तर त्याही पेक्षा देशाचे संरक्षण करताना आपल्याला वीरमरण यावे आणि परमवीर चक्र मिळाले असे स्वप्न फक्त जे लष्करात असतात त्यांचेच असते. असे स्वप्न पाहणारे आणि सत्यात उतरवणारे नावेही काही कमी नाहीत. ज्यांनी देशाच्या लष्करात काम करताना परमवीर चक्र (Param Vir Chakra) मिळवलं आहे. मात्र असा पराक्रम जीवंत असताना झाला तर, हो जीवंत असताना. देशाचा पहिला भारतीय सैनिक (Indian Soldier) ज्याला जिवंत असताना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. कारण त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना १५ दिवस खाण्यापिण्याविना मागे ढकलले. तर घुसखोरांच्या तावडीतून नौशेराची मुक्तता व्हावी म्हणून भारतीय रणगाडे आणि सैनिकांसाठी मार्ग मोकळा केला… तर चला मग जाणून घेऊया या पराक्रमी सैनिकाची कहाणी…

राम राघोबा राणे

10 जुलै 1940 रोजी 22 वर्षीय राम राघोबा राणे ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले. उत्साहाने भरलेल्या कामाची ती सुरुवात होती. पण देशभक्ती त्यापेक्षा कमी नव्हती. त्याचे शौर्य दुसऱ्या महायुद्धात दिसून आले, जेव्हा त्यांनी बर्माच्या सीमेवर जपानी लोकांचा पराभव केला. पण 1948 मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते वीरचे परमवीर झाले. एवढी शौर्य, एवढी देशभक्ती, उत्कृष्ट लढाऊ कौशल्य आणि शत्रू 72 तास प्रयत्न करत राहिला, मात्र ते राणांना हलवू शकले नाहीत.

18 मार्च 1948 रोजी नौशेरा सेक्टरमधील झांगर भारतीय सैन्याने पुन्हा ताब्यात घेतला. त्यांच्यापुढे राजौरी कशी मिळवायची हा प्रश्न होता. 8 एप्रिल 1948 रोजी चौथी डोगरा बटालियन राजौरीकडे निघाली. यादरम्यान बटालियनने बारवली रिजवरून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले आणि ते ताब्यात घेतले. हे ठिकाण नौशेरापासून 11 किमी अंतरावर होते. पण पुढच्या वाटेवर अनेक अडचणी होत्या. भूसुरुंग लावण्यात आली होती. त्यामुळे ना सैन्याला पुढे जाता येत होतं आणि ना रणगाडे. त्यावेळी 37 असॉल्ट फील्ड कंपनीच्या सेक्शनचे कमांडर राम राघोबा राणे डोग्रा रेजिमेंटच्या मदतीला धावून आले.

हे सुद्धा वाचा

राम नसता तर मार्ग मोकळा झाला नसता

राम राघोबा राणे यांनी त्यांच्या टीमसह मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील अडथळे आणि भूसुरुंग हटवण्यास सुरुवात झाली. यावेळी पाकिस्तानने मोर्टार डागले. यामध्ये राणेंचे दोन साथीदार शहीद झाले. तर पाच जण जखमी झाले होते. राणेही जखमी झाले. पण राणे आणि त्यांची टीम थांबली नाही. प्रत्युत्तरात हल्ला करत संध्याकाळपर्यंत भूसुरुंग हटवण्यात आली. त्यामुळे रणगाड्यांना पुढे जाण्याचा मार्ग मिळाला. पण रस्ता सुरक्षित नव्हता. त्यामुळे रणगाडे पुढे जातील असा रस्ता बनवावा लागणार होता. राणेंनी रातोरात रणगाड्यांसाठी रस्ता केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सलग 12 तास काम केले. भूसुरुंग हटवत राहीले. मार्ग बनवत राहीले.

जखमी झाले पण आत्मविश्वास कमी झाला नाही

जिथे रस्ता योग्य होता, तिथे तो वळवायचे. पाकिस्तानी गोळीबार आणि मोर्टार हल्ल्यांना न जुमानता राणे आणि त्यांची टीम काम करत राहिली. 10 एप्रिल रोजी सकाळी राम राघोबा राणे उठले आणि रस्ता क्लेअर करू लागले. दोन तासात त्यांनी मोठा रस्ता क्लेअर केला. यादरम्यान पाकिस्तानींनी मोर्टार आणि मशीनगनने हल्ले सुरूच ठेवले. राणेंच्या या कार्यामुळे चौथी डोगरा बटालियन 13 किलोमीटर पुढे जाऊ शकली. भूसुरुंग हटवणे, मार्ग मोकळा करणे आणि ते ठीक करण्याचे काम राणे आणि त्यांची टीम करत होती. तर डोगरा रेजिमेंट आणि रणगाडे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत होते.

तीन दिवस सतत काम करून मार्ग तयार केला

मात्र उंचावर बसून पाकिस्तानी थेट रस्त्यावरच हल्ला करत होते. त्यानंतर रणगाड्याच्या मागे लपलेल्या राम राघोबा राणे यांनी स्फोट करून रस्ता उडवला. रात्र होण्यापूर्वी त्यांनी हे काम पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशी 11 एप्रिल रोजी राणे आणि त्यांच्या टीमने पुन्हा 17 तास काम केले. आता हे लोक चिंगास गाठले होते. म्हणजे नौशेरा आणि राजौरीचा मध्यमार्गावर. हा जुना मुघलकालीन मार्ग होता. 8 ते 11 एप्रिल दरम्यान केलेल्या मार्गांमुळे भारतीय लष्कर राजौरीपर्यंत पोहोचू शकले. यावेळी 500 हून अधिक पाकिस्तानी मारले गेले. हजारो जखमी झाले.

21 जून 1950 रोजी सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यापूर्वी काही महिने त्यांना लेफ्टनंट बनवण्यात आले होते. 1954 मध्ये कॅप्टन करण्यात आले. राणे 25 जानेवारी 1968 रोजी मेजर म्हणून ते निवृत्त झाले. 1994 मध्ये पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

बापूंच्या चळवळीत सामील होणार होते

26 जून 1918 रोजी कर्नाटक राज्यातील हावेरी या छोट्या गावात राहणारे राघोबा पी राणे यांच्या घरी जन्म झाला. वडील पोलीस होते. त्यामुळे राणेंचे शिक्षण आणि लेखन उत्तम होते. राणे यांनी 1930 मध्ये गांधींची असहकार चळवळ पाहिली तेव्हा ते 12 वर्षांचे होते. या चळवळीने ते इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी या चळवळीचा एक भाग होण्याचे ठरवले होते. मात्र, वडिलांना त्यांनी त्यात सहभागी व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी राणेंना त्यांच्या मूळ गावी चेंदिया येथे घेऊन गेले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.