‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!
Accident Death : कोरोना महामारीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. सलीलही त्यापैकीच एक. हॉटेल मॅनेजरच्या नोकरीमध्ये त्याचा संसार अगदी सुरळीत सुरु होता. पण पहिल्या लॉकडाऊननं त्याचं आयुष्य बदललं.
दिल्ली : शनिवारी रात्री एक भयंकर अपघात घडला होता. दिल्लीत झालेल्या या अपघातान एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला. एका पोलिसानंच या माणसाला आपल्या गाडीखाली चिरडलं. ज्यात एका 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या या अपघातानंतर मृत्यू झालेल्या 38 वर्षीय इसमाच्या आयुष्याबद्दल समोर आलेल्या गोष्टी अत्यंत विदारक आणि वेदनादायी आहेत. सलील त्रिपाठीचा (Salil Tripathi) दिल्लीत झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. सलील 38 वर्षांचे असून त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या पश्चात बायको आणि 10 वर्षांचा मुलगा आहे. सलील हे खरंतर एका हॉटेलमध्ये मॅनेजर होते. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांची नोकरी गेली. कोरोना दुसऱ्या लाटेनं त्यांना डिलव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) व्हायला भाग पाडलं आणि अखेर तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave in India) घडलेल्या एका नकोशा प्रसंगानं त्यांचा अख्का संसार रस्त्यावर आणलाय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या सलील यांचा मृतदेह रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांच्या आयुष्याला मिळालेलं वळण हे अंगावर काटा आणणारं असून त्यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांची पत्नी आणि मुलगा पोरके झाले आहेत. वडीलांच्या निधनानंतर सलीलच्या मुलानं आपल्या आईला प्रश्न विचारलाय. ‘आता आपण काय करायचं गं?’ या दहा वर्षांच्या चिमुरड्यानं विचारलेल्या प्रश्नाला आता काय उत्तर द्यायचं, यानं सलीलचे कुटुंबीय गलबलून गेले आहेत.
हॉटेल मॅनेजर ते डिलीव्हरी बॉय
सलील त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशच्या अयोध्याचे. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या हॉटेलमध्ये काम केलं. प्रचंड मेहनतीच्या जोरावर अखेर एका बड्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी हॉटेल मॅनेजर होण्यापर्यंत मजल मारली. आपल्या करीअरच्या ऐन भरारीच्या काळातच कोरोना एखाद्या व्हिलनसारखा आला आणि त्यानं सलील यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
#SalilTripathi, a 38-year-old restaurant manager, who also worked as a @zomato delivery executive to make ends meet for his family, died after a #DelhiPolice constable allegedly rammed his SUV into him. The incident took place in Rohini on Saturday night. pic.twitter.com/0HVJysNrRg
— The Indian Express (@IndianExpress) January 11, 2022
म्हणून मॅनेजर डिलिव्हरी बॉय झाला
कोरोना महामारीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. सलीलही त्यापैकीच एक. हॉटेल मॅनेजरच्या नोकरीमध्ये त्याचा संसार अगदी सुरळीत सुरु होता. पण पहिल्या लॉकडाऊननं त्याचं आयुष्य बदललं. सलीलची नोकरी गेल्यामुळे आता त्याला रात्रंदिवस एक करुन काम करावं लागत होतं, अशी माहिती सलील यांचा भाऊ मनोज त्रिपाठी यांनी दिली आहे. मनोज हे पेशानं शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहेत. घर कसं चालवायचं, अशा विंवचनेत असलेल्या सलील मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी वाटेल ते काम केलं. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून सलील दिवसरात्र काम करायला.
डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या सलीलची कमाई प्रचंड घटली होती. जिथे रेस्टॉरंटमध्ये त्याला चाळीत ते पन्नास हजार इतका पगार मिळत होता, तिथे आता त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून अवघे आठ ते दहा हजार मिळत होते, असंही सलीलच्या कुटुंबीयांनी सांगितलंय. आता आपण काय करणार? कुठे जाणार? असे प्रश्न सलीलचा दहा वर्षांचा मुलगा आपल्या आईला विचारत आहे. पण तिच्याकडे कोणतंच उच्चर नाही.
पगार न देतात नोकरीवरुन काढलं
धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यानंतर त्यांनी पगारही देण्यात आला नाही. याची खंतही सलीलच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे. आता सगळं सपलंय, आपण शून्य झालो आहोत, अशी अवस्था सलीलची पत्नी आणि त्याच्या मुलाची झाली आहे.
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं झोमॅटोच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. झोमॅटोची टीम सलीलच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांची मदत करण्यासाठी तत्पर असल्याचीही भावना झोमॅटोच्या टीमनं व्यक्त केली आहे.
नियतीचा क्रूर खेळ!
कोरोना महामारीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालेल्या महामारीमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यांच्याबद्दल जिग्नासा सिन्हा या इंडियन्स एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीनं इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळावरुन माहिती दिली आहे. शनिवारी एका एसयूव्हीनं सलील त्रिपाठीला जोरदार धडक दिली होती, ज्यात सलील यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, ही एसयूव्ही एक पोलीस कर्मचारीच चालवत असल्याचं नंतर उघडकीस आलं असून अपघात ज्या रात्री घडला, त्याच रात्री या पोलिसालाही ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, भरधाव वेगानं एसयूव्ही चालवणाऱ्या एसयूव्ही कारचा चालक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानं दारु पिऊन गाडी चालवली होती का, याचा आता शोध घेतला जातो आहे.
संबंधित बातम्या –
कुत्र्याला वाचवणं जिवावर बेतलं, 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू, कुटुंबियांवर शोककळा
सांगलीत गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू; एकजण काच फोडून बाहेर
Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण