Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका लग्नाची वेगळी गोष्ट, राँग नंबरने सुरु झाली प्रेम कहाणी, घरच्यांनी केला विरोध तर इन्सपेक्टरने पोलीस स्टेशनात लावून दिले लग्न

पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार यादव यांनी दोन्ही घरातील कुचुंबीयांची समजूत काढली आणि पोलीस ठाण्यातच या दोघांचे लग्न लावून दिले. घरच्यांचा याला विरोध कायम होता, त्यामुळे ते फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे पोलीस इन्सपेक्टर यांनी मुलीच्या बाजूने तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मुलाच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली.

एका लग्नाची वेगळी गोष्ट,  राँग नंबरने सुरु झाली प्रेम कहाणी, घरच्यांनी केला विरोध तर इन्सपेक्टरने पोलीस स्टेशनात लावून दिले लग्न
पोलीस स्टेशनात लग्नImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:30 PM

शिवहर, बिहार – ही एका अनोख्या प्रेमाची आणि लग्नाची (love marriage)कहाणी आहे. अनोखी याच्यासाठी की या कहाणीत अनेक ट्विस्ट आणि क्लायमेक्स आहेत. ही प्रेम कहाणी सुरु झाली त्यावेळी एका तरुणाने एका तरुणीला फोन केला. पण तो राँग नंबर (wrong number)होता. त्यानंतर हा राँग नंबर या दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम जुळवळ्यासाठी मात्र करेक्ट नंबर राहिला. त्यांचं लग्नही वेगळ्याच रितीने झाले. धुमधडाक्यात, हॉलमध्ये लग्न न होता या दोन्ही नवदाम्पत्याने पोलीस स्टेशनमध्ये सप्तपदी घेतली. दोघांच्या घरच्यांनी जेव्हा लग्नाला विरोध केला तेव्हा पोलीस ठाण्यातील (police station)इन्सपेक्टरने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न लावून दिले. हा सगळा प्रकार बिहारमध्ये घडला. शिवहर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हा लग्न सोहळा पार पडला.

कशी सुरु झाली प्रेम कहाणी?

कुशहरमध्ये राहणाऱ्या प्रिया कुमारी आणि पहाडपूर गावातील सूरज कुमार हे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया आणि सूरज यांच्यात संभाषणाची सुरुवात राँग नंबरमुळे झाली. त्यानंतर ते दोघएही एकमेकांशी नियमित बोलू लागले. मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. या काळात ते दोघे एकमेकांना भेटायलाही लागले. यातच एक महिन्यापूर्वी या दोघांनी घरच्यांना न सांगता पुनौराधाम मंदिरात एकमेकांशी लग्नही उरकून घेतले. लग्न झाल्यानंतरही ते आपआपल्या घरातच राहत होते.

लग्नाला घरच्यांचा विरोध

ही लग्नाची बाब काही दिवसांतच उघड झाली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी प्रिया कुमारीला बाहेर जाण्यास मनाई केली. दोघांनीही जेव्हा आपआपल्या घरी लग्नाबाबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही घरातील कुटुंबीयांनी त्याला साफ नकार दिला. घरचे ऐकत नाहीत हे पाहिल्यानंतर हे दोघेही घरातून पळून गेले. त्यानंतर प्रिया कुमारीच्या घरच्यांनी मुलगी पळून गेल्याची तक्रर पोलीस ठाण्यात नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की या दोघांचा विवाह यापूर्वीच झालेला आहे. मुलीचीही मुलासोबत राहण्याची इच्छा आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस स्टेशनमध्येच उरकला विवाहसोहळा

त्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार यादव यांनी दोन्ही घरातील कुचुंबीयांची समजूत काढली आणि पोलीस ठाण्यातच या दोघांचे लग्न लावून दिले. घरच्यांचा याला विरोध कायम होता, त्यामुळे ते फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे पोलीस इन्सपेक्टर यांनी मुलीच्या बाजूने तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मुलाच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली. लग्नानंतर मुलगा मुलीला घेवून त्याच्या घरी गेला. आता सगळ्या जिल्ह्यात या वेगळ्या लग्नाच्या गोष्टीची चर्चा सुरु आहे.

हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....