AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Steel Jamshedpur: गॅस लाईनमध्ये स्फोट; जमशेदपूरमधील टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये अग्नितांडव

सध्या बॅटरी 6 काम करत नाही आणि ती काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. लेस आणि फायर ब्रिगेड तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात नाकाबंदी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी टीएमएचमध्ये पाठवण्यात आले आहे.

Tata Steel Jamshedpur: गॅस लाईनमध्ये स्फोट; जमशेदपूरमधील टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये अग्नितांडव
जमशेदपूरमधील टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये अग्नितांडवImage Credit source: ANI
| Updated on: May 07, 2022 | 3:11 PM
Share

जमशेदपूर : जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट (Blast) झाला असून यात दोन कर्मचारी जखमी (Injured) झाले आहेत. प्लांटला आग लागल्याने आणि गॅसची गळती झाल्यानंतर कामगारांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सकाळी 10.20 वाजता ही आग लागली. त्यानंतर अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. IMMM कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 आणि 7 मध्ये ही घटना घडली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात चेंगराचेंगरी झाली असून, घबराटीचे वातावरण पसरले आहे. (A fire broke out in a gas line at Tata Steel plant in Jamshedpur)

सध्या बॅटरी 6 काम करत नाही आणि ती काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. लेस आणि फायर ब्रिगेड तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात नाकाबंदी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी टीएमएचमध्ये पाठवण्यात आले आहे, असे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विषारी वायू गळतीमुळे कर्मचाऱ्यांच्या छातीत वेदना

आधी एक आवाज आला त्यानंतर कर्मचाऱ्याच्या छातीत दुखू लागले. विषारी वायु गळतीमुळे कर्मचाऱ्याच्या छातीत दुखू लागले. सध्या या कर्मचाऱ्यावर टीएमएचमध्ये उपचार सुरु आहेत. साहित्य कुमार असे उपचार सुरु असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मेसर्स एसजीबी कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे साहित्य कुमार घटनास्थळी काम करत होते. ते कोक प्लांटमध्ये बुस्टर लाइनसाठी मचान बनवण्याचे काम करत होते. त्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला, काही कण हवेत उडताना दिसले. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली दुखापत झाली आहे, असे टाटा कॉर्पोरेट कम्युनिकेशनने सांगितले. (A fire broke out in a gas line at Tata Steel plant in Jamshedpur)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.