AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhya Pradesh Train Accident : उभ्या असलेल्या मालगाडीला दुसरी मालगाडी धडकली; इंजिनला आग, लोको पायलटचा मृत्यू

मध्य प्रदेशातील सिंगपूर रेल्वे स्थानकात भीषण अपघाताची घटना घडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, काही ट्रेनच मार्ग बदलण्यात आले आहेत.

Madhya Pradesh Train Accident : उभ्या असलेल्या मालगाडीला दुसरी मालगाडी धडकली; इंजिनला आग, लोको पायलटचा मृत्यू
मध्य प्रदेशात मालगाडीचा भीषण अपघातImage Credit source: Social
| Updated on: Apr 19, 2023 | 2:36 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिंगपूर रेल्वेस्थानकात मालगाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एक मालगाडी दुसऱ्या मालगाडीवर धडकली. यामुळे मालगाड्यांच्या इंजिनला आग लागली. यात एका लोको पायलटचा मृत्यू झाला आहे. दुसरा लोको पायलट आणि अन्य कर्मचारी या अपघातात जखमी झाले आहेत. राजेश प्रसाद असे मयत लोको पायलटचे नाव आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर झोनच्या शहडोल उपविभागातील सिंगपूर रेल्वे स्टेशनवर आज सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

मालगाडीचा सिग्नल ओव्हरशूट झाल्याने दुर्घटना

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर-कटनी रेल्वे विभागातील सिंगपूर स्टेशनवर कोळसा भरलेल्या मालगाडीचा सिग्नल ओव्हरशूट झाल्यामुळे इंजिनसह 9 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील अप-डाऊन आणि मिडल अशा तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. त्याचबरोबर या अपघातानंतर रेल्वेने 10 गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

अपघातामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन चालवण्यात येत आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) 08740(BSP-SDL) बिलासपूर-शहडोल मेमू 2) 08749(SDL-ABKP-) शहडोल-अम्बिकापूर मेमू 3) 08758(ABKP-APR) अम्बिकापूर-अनुपपूर मेमू 4) 08759(APR-MDGR) अनुपपूर-मनेंद्रगढ मेमू 5) 08757(MDGR-ABKP) मनेंद्रगढ-अम्बिकापूर मेमू 6) 08750(ABKP-SDL) अम्बिकापूर-शहडोल मेमू 7) 08739(SDL-BSP) शहडोल-बिलासपूर मेमू 8) 18756(ABKP-SDL) अम्बिकापूर-शहडोल 9) 18755(SDL-ABKP) शहडोल-अम्बिकापूर मेमू 10) 18234(BSP-INDB) बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस

पुनर्निर्धारित गाड्या

20847 (DURG-UHP) ऊधमपूर एक्सप्रेस दोन तास उशिराने रवाना होईल.

शॉर्ट टर्मिनेशन ट्रेन

1) 08747 (BSP-KTE) बिलासपूर–कटनी ट्रेन पेंड्रारोडपर्यंतच धावेल. 2) 11266 (ABKP-JBP ) अम्बिकापुर–जबलपूर ट्रेन बिजुरीपर्यंत धावेल. 3) 11265 (JBP-ABKP) जबलपूर–अम्बिकापूर ट्रेन जबलपूर मंडलपर्यंत धावेल.

मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या

15231 (BJU-G) बरौनी-गोंदिया ट्रेन

18208 (AII-DURG) अजमेर–दुर्ग ट्रेन

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.