AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी आता ‘आधार’ गरजेचं

ड्रायव्हिंग लायसन्स ग्राहक आणि वाहन मालकांना 16 प्रकारच्या ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेसचा लाभ घ्यायचा असल्यास आधार ऑथेंटिकेशन आवश्यक असणार आहे.

Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी आता 'आधार' गरजेचं
आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा
| Updated on: Feb 10, 2021 | 3:22 PM
Share

मुंबई : तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन रिन्यूअल करायचं असल्यास तुम्हाला ‘आधार’ गरजेचं होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हिंग लायसन्स ग्राहक आणि वाहन मालकांना 16 प्रकारच्या ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेसचा लाभ घ्यायचा असल्यास आधार ऑथेंटिकेशन आवश्यक असणार आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसमधील तुमच्या चकरा वाचणार आहेत. सरकारने त्यासाठी एक ड्राफ्ट तयार केला आहे. सध्या मात्र ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससह अनेक सेवांसाठी आधार गजरेचं नाही.(Aadhar card will now be required to renew driving license online)

कोणत्या सेवांसाठी आधार गरेजचं?

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानुसार लर्निंग लायसन्स, ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल, पत्ता बदल करणे, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रान्सफर नोटीस आणि वाहन मालकी ट्रान्सफर करण्यासारख्या 16 सेवांसाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचं असणार आहे.

आधार ऑथेंटिकेशन ऐच्छिक

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या ड्राफ्ट नुसार पोर्टलद्वारे विविध सेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आधार ऑथेंटिकेशन प्रक्रियेतून जावं लागेल. हे ऐच्छिक आधार ऑथेंटिकेशन नकली कागदपत्राद्वारे आणि व्यक्तीद्वारे काढण्यात आलेल्या एकापेक्षा अधिक ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी मदतीचं ठरणार आहे,.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट गरजेची नसेल

जर तुम्ही कोणत्या ड्रायव्हिंग सेंटरमधून गाडी चालवण्यास शिकले असाल तर लायसन्ससाठी तुम्हाला कुठलीही टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं या योजनेवर काम सुरु केलं आहे. मंत्रालयाने यासाठी एक ड्राफ्ट तयार केला आहे. मंत्रालयाने नोटिफेकेशन जारी करुन लोकांकडून सल्ला मागवला आहे.

घरबसल्या लायसन्स रिन्युअल करा

तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल करु शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्ज डाऊनलोड करुन भरावा लागेल आणि तो स्कॅन करुन अपलोड करावा लागेल. जर तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एखाद्या सर्टिफाईड डॉक्टरकडून फॉर्म 1H भरावा लागेल. त्यासह एक्सपायर झालेलं ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड अपलोड करावं लागेल.

संबंधित बातम्या :

Paytm वरुन चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेल्यास काय कराल? जाणून घ्या कसे मिळतील पैसे परत

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस, कंपन्यांचे नशीब पालटणार?

Aadhar card will now be required to renew driving license online

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.