AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Municipal Election Result : गुजरात महापालिका निवडणुकीत ‘आप’ची दमदार एन्ट्री, 26 फेब्रुवारीला केजरीवालांचा रोड शो

काँग्रेसला जोरदार झटका देत सूरत महापालिकेत आम आदमी पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या रुपाने आकाराला आलाय. सूरतमधील पक्षाच्या प्रदर्शनावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केलाय.

Gujarat Municipal Election Result : गुजरात महापालिका निवडणुकीत 'आप'ची दमदार एन्ट्री, 26 फेब्रुवारीला केजरीवालांचा रोड शो
अरविंद केजरीवाल यांची पाच वर्षासाठी राष्ट्रीय संयोजक म्हणून निवड करण्यात आली
| Updated on: Feb 23, 2021 | 6:58 PM
Share

नवी दिल्ली : गुजरात महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षानं दमदार एन्ट्री केली आहे. आपने पहिल्यांदाच गुजरातमधील महापालिका निवडणूक लढवली आहे. अशावेळी काँग्रेसला जोरदार झटका देत सूरत महापालिकेत आम आदमी पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या रुपाने आकाराला आलाय. सूरतमधील पक्षाच्या प्रदर्शनावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर केजरीवाल 26 फेब्रुवारीला सूरतमध्ये रोड शो करतील आणि गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त करतील, असंही सांगण्यात आलं आहे.(Aam Aadmi Party is the No. 2 party in Surat Municipal Corporation elections)

काँग्रेसचा भोपळाही फुटला नाही!

सूरत महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 93 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पार्टीने 27 जागांवर विजय संपादन केला आहे. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसला सूरतमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. गुजरातमधील राजकारणाची ही नवी सुरुवात असल्याचं आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

सिसोदियांकडूनही मतदारांचे आभार

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘गुजरात महापालिका निवडणुकीत ज्या प्रमाणे मतदारांना प्रेम आणि समर्थन दिलं आहे, त्या बद्दल प्रत्येक मतदारांचे मन:पूर्वक आभार. सर्व साथिदारांना शुभेच्छा. आपण सर्व मिळून कामाचं राजकारण करु’, असं ट्वीट सिसोदिया यांनी केलं आहे.

पाटीदार समाजाचा ‘आप’ला पाठिंबा

सूरत हा पाटीदार समाजाचा गड मानला जातो. गेल्या 25-30 वर्षात पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र या निवडणुकीत पाटीदार समाजातील मतदारांनीच आम आदमी पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाळ इटालिया हे सूरतमधील पाटीदार समाजातूनच येतात. त्याचा परिणामही या निवडणुकीत पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या :

Gujarat Municipal Election Result : सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

Gujrat Municipal Election Result : गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

Aam Aadmi Party is the No. 2 party in Surat Municipal Corporation elections

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.