ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना

पश्चिम बंगालच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. (Abbas Siddiqui Floats New Political Outfit Ahead Of west bengal Assembly Polls)

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 5:53 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि सिंगूर, नंदिग्राम आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावणारे फुरफुरा शरीफ दर्ग्याचे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ असं सिद्दीकी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. (Abbas Siddiqui Floats New Political Outfit Ahead Of west bengal Assembly Polls)

पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज पत्रकार परिषद इंडियन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. हा पक्ष राज्यात 294 जागा लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिद्दीकी यांच्या या घोषणेमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

ओवेसींशी भेट

सिद्दीकी हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. पक्ष स्थापन करण्यापूर्वी सिद्दीकी यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून सिद्दीकी यांचं ममता बॅनर्जी यांच्याशी बिनसल्याने त्यांनी ममता सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी आज नवा पक्ष स्थापन करून ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला आहे.

31 टक्के मुस्लिम मतदार

पश्चिम बंगालमध्ये 31 टक्के मुस्लिम मतदार आहेत. हा मुस्लिम मतदार टीएमसी आणि डाव्यांचा जनाधार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एमआयएमसह सिद्दीकी यांच्या पक्षानेही उडी घेतल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊन त्याचा भाजपलाच फायदा होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

100 जागांवर प्रभाव

ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सिद्दीकी यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या सुमारे 100 मतदारसंघात सिद्दीकी यांचा प्रभाव आहे. आता तेच निवडणूक मैदानात उतरल्याने ममता बॅनर्जींना किमान 40 ते 60 ठिकाणी नुकसान होऊ शकतं, असं राजकीयन निरीक्षक सांगत आहेत. (Abbas Siddiqui Floats New Political Outfit Ahead Of west bengal Assembly Polls)

संबंधित बातम्या:

तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचंय?, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

भाजपकडून TMC ला सुरुंग, आणखी एक आमदार फोडला, ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या सभेपूर्वीच बॉम्बफेक, एक जखमी; बंगाल हादरले

(Abbas Siddiqui Floats New Political Outfit Ahead Of west bengal Assembly Polls)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.