भगवान श्रीकृष्णसंदर्भातील या सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना ‘बाल संत’ अभिनव अरोडाची भंबेरी, दिली चुकीची उत्तरे

Abhinav Arora: दहा वर्षीय अभिनव स्वत:ला भगवंत श्रीकृष्ण यांचे मोठे भक्त सांगतात. त्यांना एका मुलाखतीत भगवान श्रीकृष्णसंदर्भात चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एकाच प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले. त्यामुळे सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल झाले आहेत.

भगवान श्रीकृष्णसंदर्भातील या सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना 'बाल संत' अभिनव अरोडाची भंबेरी, दिली चुकीची उत्तरे
Abhinav Arora
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 10:00 AM

Abhinav Arora: वादग्रस्त बालकथा वाचक अभिनव अरोड सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल होत आहे. अभिनव यांचा वापर त्यांचे आई-वडील रिल बनवण्यासाठी करत असल्याचे आरोप आहे. रिल बनवून अभिनव अरोडा लोकांच्या श्रद्धेची खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. दहा वर्षीय अभिनव स्वत:ला भगवंत श्रीकृष्ण यांचे मोठे भक्त सांगतात. त्यांना एका मुलाखतीत भगवान श्रीकृष्णसंदर्भात चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एकाच प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले. त्यामुळे सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल झाले आहेत. कृष्ण भक्त असणे आणि पुस्तकी ज्ञान पाठ करणे यामध्ये फरक असल्याच्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.

असे प्रश्न विचारले

अभिनव अरोडा हे बालसंत म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्याबाबत वादही निर्माण झाले आहे. एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांच्यासंदर्भात चार प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, भगवान श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र कोणी दिले? त्यावर ते म्हणाले, त्या प्रश्नाचे उत्तर देताना ते अडखडले. मग शिव महापुराणचा संदर्भ दिला. त्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र दिल्याचे सांगितले. हे उत्तर चुकीचे होते. भगवान श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र परशुराम यांनी दिले होते.

कृष्ण नावाचा अर्थ असा सांगितला

अभिनव यांना दुसरा प्रश्न भगवान कृष्ण यांचा नावाचा अर्थ काय असा विचारला? त्यावर अभिनव म्हणाले, कृष्ण नावाचा अर्थ सुंदर आहे. त्यांना पुन्हा हा प्रश्न विचारल्यावर ते इकडे तिकडे पाहू लागले. त्यानंतर ‘कष्ट हरने वाला।’ असे उत्तर दिले. परंतु भगवान कृष्ण यांचा नावाचा अर्थ श्याम आहे. कृष्ण हा शब्द कोणत्या भाषेतून आला, त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही.

हे सुद्धा वाचा

हे एकमेव उत्तर बरोबर

भगवान कृष्ण यांचे पूर्ण नाव काय? असा तिसरा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कृष्ण असेच उत्तर दिले. परंतु भगवान कृष्ण यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण वासुदेव आहे. चौथे आणि शेवटचा प्रश्न अभिनव यांना विचारले. वासुदेव कोणाचे नाव आहे? त्याचे उत्तर अभिनव यांनी बरोबर दिले. वासुदेव भगवान कृष्ण यांच्या वडिलांचे नाव असल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यांचे हे एकमेव उत्तर बरोबर होते.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.