AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत ABVPचा सुपडा साफ, काँग्रेस आणि सपाच्या विद्यार्थी संघटनेचा मोठा विजय

वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं मोठा विजय मिळवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत ABVPचा सुपडा साफ, काँग्रेस आणि सपाच्या विद्यार्थी संघटनेचा मोठा विजय
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 10:36 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये भाजपची विद्यार्थी संघटना ABVPचा सुपडा साफ झालाय. वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत NSUI आणि समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेनं आघाडी केली होती.(ABVP’s big defeat at Mahatma Gandhi Kashi University in Varanasi)

NSUI ने महात्मा गांधी काशी विद्यापीठातील उपाध्यक्ष, महामंत्रीसह 6 जागांवर कब्जा मिळवला आहे. या ठिकाणी एकूण 8 जागांवर निवडणूक पार पडली. त्यातील 6 जागांवर NSUIने विजय संपादन केला आहे. NSUIचे संदीप पाल उपाध्यक्ष तर प्रफुल्ल पांडेय महामंत्री बनले आहेत. तर सपाच्या विद्यार्थी संघटनेचे विमलेश यादव अध्यक्षपदी निवडून आले आहेत.

विजयी उमेदवार –

विमलेश यादव (सपा) – अध्यक्ष संदीप पाल (NSUI) – उपाध्यक्ष प्रफुल्ल पांडे (NSUI) – महामंत्री आशिष गोस्वामी (अपक्ष) – पुस्तकालय मंत्री

वाराणसी हा सुरुवातीपासूनच भाजप आणि RSSचा गड मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातूनच लोकसभेवर गेले आहेत. वाराणसी हे हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे इथं सातत्यानं भाजपला फायदा मिळतो. असं असतानाही भाजपचीच विद्यार्थी संघटना असलेल्या ABVPला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठ छात्र संघाच्या चारही पॅनलपैकी एकही जागा ABVPला मिळालेली नाही.

वाराणसीतील या निकालामुळे आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षात उत्साह संचारला आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. अशावेळी राज्यातील कुठलीही निवडणूक उत्तर प्रदेश, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेससाठीही महत्वाची आहे.

संबंधित बातम्या :

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव, आता राहुल गांधी म्हणतात…

Gujrat Municipal Election Result : गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

ABVP’s big defeat at Mahatma Gandhi Kashi University in Varanasi

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.