कडाक्याची थंडी, दाट धुकं; रस्ता न दिसल्यामुळे 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या, तिघांचा मृत्यू

य़ा अपघातात तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. देशात सर्वात वैगवाग समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पेरिफेरल आग्रा एक्स्प्रेस वेवर (Eastern Peripheral Expressway) हा अपघात झाला.

कडाक्याची थंडी, दाट धुकं; रस्ता न दिसल्यामुळे 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या, तिघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 1:35 PM

लखनऊ : दाट धुक्यामुळे समोरचा रस्ता न दिसल्यामुळे बाघपत (baghpat)  जिल्ह्यात एक विचित्र अपघात (Accident)  झाला. य़ा अपघातात तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. देशात सर्वात वैगवाग समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पेरिफेरल आग्रा एक्स्प्रेस वेवर (Eastern Peripheral Expressway) हा अपघात झाला. या अपघातात कित्येक जण जखमी झाले असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर दाट धुकं जमा झाल्यामुळे हा अपघात घडला. (accident in baghpat district on Eastern Peripheral and Agra Expressway)

सध्या संपूर्ण देशामध्ये थंडीची वाढली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर याची तीव्रता आणखी वाढली आहे. थंडी वाढल्यामुळे धुकंही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणं अवघड होऊन बसलं आहे. याच धुक्यामुळे बाघपत (baghpat) येथे हा अपघात झाला. आगरा एक्स्प्रेस वेवर झालेला हा अपघात अत्यंत भीषण आहे. या अपघातात एकूण 18 गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. पेरिफेरल आग्रा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात वेगवान रस्ता म्हणून ओळखळा जातो. याच रस्त्यावर तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत आतापर्यंत एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बाघपतमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान,अपघाताची माहिती होताच बचाव पथक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाकडून वेगाने बचावकार्य करुन रस्ता मोकळा केला आहे. एवढा मोठा अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

संबंधित बातम्या :

Weather Forecast : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लहर, आगामी दोन दिवस हुडहुडी कायम

IRCTC ची वेबसाईट सुपरफास्ट, 1 मिनिटात 25 हजार तिकीट बुकिंग क्षमता, 12 नवे फीचर्स

BREAKING NEWS : उच्च न्यायालयाच्या चार मुख्य न्यायाधीशांसह 10 न्यायाधीशांची बदली, कायदा मंत्रालयाची माहिती

(accident in baghpat district on Eastern Peripheral and Agra Expressway)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.