300 च्या स्पीडने बाईक चालवणाऱ्या Youtuber चा एक्सप्रेस-वे वरील भयानक अपघातात मृत्यू

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झालेल्या अपघातात युट्यूबरचा मृत्यू झाला. दिल्लीचा एक YouTuber यमुना एक्स्प्रेस वेवर 300 च्या स्पीडने वेगाने बाईक चालवत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

300 च्या स्पीडने बाईक चालवणाऱ्या  Youtuber चा एक्सप्रेस-वे वरील भयानक अपघातात मृत्यू
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 1:17 PM

अलिगढ : उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झालेल्या अपघातात (accident) युट्यूबरचा मृत्यू (youtuber died )झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना एक्सप्रेसवेवर तो YouTuber ताशी 300 किलोमीटर वेगाने बाइक चालवत होता. यादरम्यान त्याची बाईक डिव्हायडरला धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, यूट्यूबर अगस्त्य आपल्या रेसिंग बाइकवरून आग्र्याहून दिल्लीला जात होता. दरम्यान, त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि वाटेत दुभाजकावर आदळली. युट्युबरने बाईक चालवताना हेल्मेट घातले होते, मात्र त्याची डिव्हायडरशी झालेली धडक एवढी जबरदस्त होती की हेल्मेटचा चक्काचूर झाला. आणि अपघातात त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

YouTuber दिल्लीचा होता रहिवासी , चॅनेलचे लाखो सबस्क्रायबर्स

मृत अगस्त्य चौहान हा तरूण दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो यूट्यूब चॅनल चालवायचा. यासाठी तो व्हिडिओ बनवत असे. यूट्यूबवर त्याचे करोडो व्ह्यूअर्स आणि लाखो सबस्क्राइबर्स आहेत. यूट्यूबर अगस्त्य चौहान बाईक चालवताना प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये एक डिस्क्लेमर देखील टाकला होता आणि लोकांना वेगाने गाडी चालवू नका असा इशारा दिला होता.

लाँग राइट स्पर्धेत होणार होता सहभागी

यूट्यूबर अगस्त्य चौहान दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. अगस्त्याने त्याची रेसिंग बाइक ताशी 300 किलोमीटर वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला. बाईक चालवताना अगस्त्य व्हिडिओही बनवत होता. अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर पहिल्यांदा 300 च्या वेगाने रेसिंग बाइक चालवली, तेव्हा त्याला बाइक हाताळता आली नाही. यादरम्यान डिव्हायडरला धडकल्याने अगस्त्यचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.