डिसेंबरमध्ये काय काय महागलं? एक प्लेट जेवणासाठी किती पैसे मोजावे लागणार ?

क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, बटाटे आणि टोमॅटोच्या किमती वाढल्याने व्हेज थाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. खरं तर, व्हेज थाळीच्या वाढलेल्या किंमतीत बटाटे आणि टोमॅटोचा वाटा 24 टक्के आहे.

डिसेंबरमध्ये काय काय महागलं? एक प्लेट जेवणासाठी किती पैसे मोजावे लागणार ?
व्हेज थाळी
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 2:32 PM

भारतात एक प्लेट जेवणाच्या थाळीच्या किमतीमुळे सामान्य माणसाच्या बजेटवर चांगलाच परिणाम झाला आहे. घरगुती थाळीच्या किंमतीतील चढ-उतारांबाबत दर महिन्याला येणाऱ्या क्रिसिलच्या नव्या अहवालात डिसेंबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किमती वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. क्रिसिल (CRISIL) च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये घरगुती शाकाहारी जेवणाच्या थाळीची सरासरी किंमत 6 टक्क्यांनी वाढून 31 रुपये 60 पैसे झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये हीच थाळी 29 रुपये 70 पैशांना तयार होत होती.

डिसेंबरमध्ये थाळीची किंमत

मात्र, मासिक आधारावर बघायला गेलं तर नोव्हेंबर 2024 मध्ये 32 रुपये 70 पैशांच्या तुलनेत व्हेज थाळीच्या किमतीत 3 टक्क्यांनी घट झाली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, बटाटे आणि टोमॅटोच्या किमती वाढल्याने व्हेज थाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. खरं तर, व्हेज थाळीच्या वाढलेल्या किंमतीत बटाटे आणि टोमॅटोचा वाटा 24 टक्के इतका आहे. अशा परिस्थितीत बटाट्याच्या दरात वार्षिक 50 टक्के वाढ आणि टोमॅटोच्या दरात 24 टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम म्हणून व्हेज थाळीदेखील महागली आहे.

या पदार्थांच्या किंमती वाढल्या

त्याशिवाय भाज्या आणि खाद्यतेलाच्या किंमतीही 16 टक्क्यांनी वाढल्या आहे. केवळ एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 11 टक्क्यांनी घट झाली असून त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचा घरगुती बजेटवर सर्वात जास्त परिणाम होतो,कारण ते तेल हे अन्नापासून ते साबणासारख्या दैनंदिन वापरांतली सर्व गोष्टींमध्ये वापरले जाते.

त्यामुळेच केवळ या ( खाद्यतेलाच्या) वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने लोकांच्या बजेटवर ताण चांगलाच वाढत चालला आहे. आता दुसरीकडे नॉनव्हेज थाळीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर डिसेंबरमध्ये त्यांची किंमतही वाढली आहे. क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीची किंमत 12 टक्क्यांनी वाढून 63 रुपये 30 पैसे झाली.

एका वर्षापूर्वी नॉनव्हेज थाळीची किंमत किती होती ?

यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये नॉन-व्हेज थाळीची किंमत ही 56 रुपये 40 पैसे इतकी होती. मासिक आधारावर देखील, नोव्हेंबरमध्ये 61 रुपये 50 पैशांना असलेल्या मांसाहारी थाळीची किंमत डिसेंबर महिन्यात 3 टक्क्यांनी वाढली आहे. मांसाहारी थाळीच्या किमतीत वाढ होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ब्रॉयलर चिकनच्या किमतीत वर्षभरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मांसाहारी थाळीच्या एकूण किंमतीध्ये 50 टक्के वाटा चिकनचा असतो. सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट सातत्याने वाढत असल्याचेच हे या महागाईच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.