Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा

प्राची आणि वसिमचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले. याच कारणातून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून आरोपी वसीमने प्राचीचा गळा दाबून खून केल्याची घटना एप्रिल 2019 मध्ये घडली होती. याप्रकरणी न्यायालयात आरोपीविरोधात खटला सुरु होता.

Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा
गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 4:05 PM

गुजरात : वडोदरा येथील ड्रामा आर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्राचीचा बॉयफ्रेंड आणि हत्येतील आरोपी वसिम मलिकला जन्मठेपे (Life Imprisonment)ची शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी.एम. उनाडकट ही शिक्षा सुनावली. प्राची आणि वसिमचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले. याच कारणातून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून आरोपी वसीमने प्राचीचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना एप्रिल 2019 मध्ये घडली होती. याप्रकरणी न्यायालयात आरोपीविरोधात खटला सुरु होता. या खटल्याचा निकाल आज न्यायालयाने सुनावला आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Accused sentenced to life imprisonment in murder case of Gujarati drama artist Prachi Maurya)

प्राची वसीममध्ये झालेल्या भांडणातून आरोपीने केली हत्या

मयत प्राची ही अपोलो स्टुडिओमध्ये ड्रामा आर्टिस्ट म्हणून काम करायची. खंबात नाटकाच्या कार्यक्रमासाठी 24 एप्रिल रोजी दुपारी प्राची वडोदराहून निघाली आणि रात्री 10 वाजता शो संपल्यानंतर वडोदऱ्यात परतली. वडोदरा येथे पोहचल्यानंतर रात्र खूप झाल्याने तिचा सहाकरी अंकित शर्मा तिला घरी सोडण्यासाठी जात होता. त्याच दरम्यान युनायटेड गरबा ग्राऊंडजवळ प्राचीचा एक्स बॉयफ्रेंड वसिम आला. यावेळी प्राची आणि वसिममध्ये भांडण सुरु झाले. यामुळे प्राचीने अंकितला जाण्यास सांगितले. यानंतर भांडण इतके विकोपाला गेले की वसिमने प्राचीचा गळा आवळला आणि पळ काढला. मात्र मोबाईल प्राचीकडेच राहिल्याचे लक्षात आल्याने तो पुन्हा प्राचीजवळ आला असता त्याला प्राचीचा श्वास सुरु असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने पुन्हा तिचा गळा आवळून तिला ठारे केले आणि पळ काढला.

पुरावे आणि सरकारी वकिलांच्या युक्तीवादावरुन आरोपीला जन्मठेप

स्थानिक नागरिकांनी सकाळी प्राचीचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत हत्या प्रकरणाचा कसून तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर वसिन विरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी पीडितेच्या बाजूने सरकारी वकील पी.एन. परमार यांनी युक्तीवाद केला. याशिवाय पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि इतर पुरावे गोळा केले होते. जे न्यायालयात सादर करण्यात आले. हे पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वसीम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Accused sentenced to life imprisonment in murder case of Gujarati drama artist Prachi Maurya)

इतर बातम्या

धुळ्यात सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची बाईकला धडक, घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने काढला पळ

CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.