यूं भोलेपन से मुस्कुराना तुम्हारा… बागेश्वर बाबांची तारीफ, आचार्य बाळकृष्ण यांची पोस्ट चर्चेत
तुझी वाट काटेविरहीत होण्यासाठी बाळकृष्णासारखे अनेक भाऊ सदैव तत्पर आहेत... तू सनातनसाठी आहेस, ठराविक संप्रदायासाठी नाही, असंही बाळकृष्ण यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्लीः वेगवेगळ्या चमत्कारांच्या दाव्यातून चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांवर (Bageshwar Baba) नुकतीच स्तुती सुमनं उधळण्यात आली. शुक्रवारी आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) आणि बागेश्वर सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushna Shashtri) यांची भेट झाली. हे दोघे बराच वेळ सोबत होते. आचार्य बाळकृष्ण यांनी बागेश्वर बाबांना प्रोत्साहन देण्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलंय… तुम धीर, धीरेंद्र हो और कृष्ण भी तो तुम ही हो, इसलिए सदैव अविचलित व अडिग बने रहो.. बागेश्वर बाबांच्या दाव्यांना होणारा विरोध, त्यांना येणाऱ्या धमक्या यासंदर्भानेही आचार्य बाळकृष्ण यांनी शुभेच्छा दिल्या.
तुझ्या वाटेतील काटे काढण्यासाठी बाळकृष्ण यांच्यासारखे अनेक भाऊ सदैव तत्पर आहेत. तू सनातनसाठी आहेस, ठराविक संप्रदायासाठी नाही, असंही बाळकृष्ण यांनी स्पष्ट केलं.
बागेश्वर बाबांची कुणा-कुणाला साद?
मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलेल्या दाव्यांवर गेल्या काही दिवसांत अनेक आक्षेप घेण्यात आलेत. तसेच बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी बागेश्वर बाबांनी पतंजली योगपीठ, योगगुरु बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांच्यासहित प्रमुख सनातन धर्माच्या आचार्यांना साथ देण्याची विनंती केली आहे. शुक्रवारी रात्री बागेश्वर बाबा हरिद्वार कनखल येथील दिव्य योग मंदिरात पोहोचले.
आचार्य बाळकृष्ण यांनी योगपीठात बागेश्वर बाबांचं जोरदार स्वागत केलं. आचार्य म्ङणाले, आपला मार्ग वेगळा आहे, मात्र ध्येय एकच आहे. त्यामुळे तुमचे येथे स्वागत आहे.
येत्या १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान बागेश्वर धाम येथे महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्रमुख संत-महंतांना आमंत्रण देण्यासाठी बागेश्वर बाबा उत्तराखंड, हरिद्वार येथे गेले होते. त्यानंतर ते दिल्लीहून छत्तरपूरला रवाना झाले.
आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्तुती…
सोशल मीडियावर बागेश्वर बाबांविषयी आचार्य बाळकृष्ण यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टचा मराठी सारांश असा- तुझं एवढं निरागस हास्य हे तुझा साधेपणा सांगण्यासाठी पुरेसं आहे. निश्चलता आणि सहजता हेच तुझं आभूषण आहे.
तुझ्या भेटी पूर्वी अविश्वास नाही पण शंका जरूर होत्या. पण आता मी ठामपणे सांगतो- महर्षी पतंजली यांनी म्हटल्याप्रमाणे, जन्मौषधिमंत्रपःसमाधिजाः सिद्धयः याचं एक उत्तम उदाहरण तू आहेस..