इरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा

पायल घोषने ट्विट करत आणखी एक दावा केला असून माझ्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची क्रिकेटपटू इरफान पठाणला (Irfan Pathan) माहिती असल्याचे तिने म्हटले आहे.

इरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:31 AM

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) नवा दावा केला आहे.  अनुराग कश्यप आणि तिच्यातील वादाबद्दल क्रिकेटपटू इरफान पठाणला माहिती असल्याचं तिनं म्हटलंय. (actress Payal Ghosh claims that cricketer Irfan Pathan know about harassment of herself by Anurag Kashyap)

पायल घोषने आपल्या ट्विटमध्ये इरफान पठाणला टॅग केलं आहे. पायलने म्हटलंय की, “अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केल्याचं मी इरफान पठाणला सांगितलं नाही. पण, अनुराग कश्यप आणि माझ्यातील वादाबद्दल इरफानला निश्चितच माहिती होतं. माझा चांगला मित्र असल्याचा इरफान दावा करायचा, पण अनुराग आणि माझ्याबद्दल सगळं काही माहीत असूनही तो या वेळी गप्प आहे.”

पायल घोषच्या या ट्विटमुळे बालिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पायल घोषने इरफान पठाणचं नाव घेतल्यानंतर आणखी काही ट्विट्स केले आहेत. ती आपल्या दाव्यावर ठाम असून  ट्विटमध्ये इरफानसोबतचा फोटो शेअर केला आहे. 2014 मध्ये होळीच्या एक दिवस आधी अनुराग कश्यपने तिला मेसेज केल्याचा दावा तिने केलाय. त्यावेळी इरफान पठाण तिच्या घरी होता. तसेच इरफानमध्ये कसलंही स्वारस्य नसून अनुरागसोबतचा वाद माहीत असल्यामुळेच त्याचं नाव घेतल्याचं ती म्हणाली.

दरम्यान, पायलने केलेल्या या धक्कादायक खुलाशामुळे बॉलिवुड विश्वात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. इरफान पठाण या सगळ्याबद्दल लवकरच बोलेल, अशी आशा पायलने व्यक्त केलीय. इरफान पठाणने यावर अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंंधित बातम्या :

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

‘हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील’, पायल घोषची पीएम मोदींना हाक

Payal Ghosh | पायल घोषच्या ‘बिनशर्त’ माफीला उच्च न्यायालयाची मंजुरी, ऋचाकडून ‘मानहानी’ केस रद्द!

(actress Payal Ghosh claims that cricketer Irfan Pathan know about harassment of herself by Anurag Kashyap)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.