Narendra Giri Death Update : महंत नरेंद्र गिरी आत्महत्येप्रकरणी आता थेट एडिशनल एसपी चौकशीच्या घेऱ्यात, भाजप, सपा नेत्यांचीही चौकशी होणार

यूपी पोलिसांतील एडिशनल एसपी ओपी पांडे याप्रकरणी चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. प्रयागराज पोलीस लवकरच ओपी पांडे यांची चौकशी करु शकते.

Narendra Giri Death Update : महंत नरेंद्र गिरी आत्महत्येप्रकरणी आता थेट एडिशनल एसपी चौकशीच्या घेऱ्यात, भाजप, सपा नेत्यांचीही चौकशी होणार
एडिशनल एसपी ओपी पांडे दोन्ही महंतांच्या खूप जवळचे मानले जातात.
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 4:29 PM

प्रयागराज: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलिसांतील एडिशनल एसपी ओपी पांडे याप्रकरणी चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. प्रयागराज पोलीस लवकरच ओपी पांडे यांची चौकशी करु शकते. एडिशनल एसपी ओपी पांडे यांच्यासोबतच इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील मिश्रा यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. सध्या महंत नरेंद्र गिरी आणि त्याचे शिष्य नरेंद्र गिरी यांच्या नात्याबद्दलही चौकशी सुरु आहे. ( Additional SP OP Pandey, SP leaders Indu Prakash Mishra and BJP Leader Sushil Mishra will also be questioned in the Mahant Narendra Giri suicide case. )

सपा नेते इंदू प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील मिश्रा महंतांच्या जवळचे

पोलिसांच्या माहितीनुसार, ओपी पांडे यांनीच मे महिन्यात महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात मध्यस्थी केली होती. एडिशनल एसपी ओपी पांडे दोन्ही महंतांच्या खूप जवळचे मानले जातात. जेव्हा ओपी पांडे यांनी मध्यस्थी केली होती, तेव्हा ते मुरादाबाद पीएसीमध्ये पोस्टिंगला होता. मध्यस्थी करणाऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील कुमार मिश्रा यांचाहा समावेश आहे. हे दोघेही महंतांच्या खूप जवळचे मानले जातात. इंदु प्रकाश मिश्रा यांना सपा सत्तेत असताना मंत्रीपदी होते. सुशील मिश्रा हे आधी बसपामध्ये होते, 2016 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले.

चौकशीसाठी एडिशनल एसपी ओपी पांडेंना प्रयागराजला बोलावणार

एडिशनल एसपी ओपी पांडे यांना पोलीस प्रयागराजला बोलवून चौकशी करु शकतात. तर उद्या सपा आणि भाजप नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यात आहे. पोलिसांचा हा प्रयत्न आहे की, या मध्यस्थीनंतरही गुरु-चेले यांच्यात वाद राहिला का आणि त्यातून काही कट शिजला का? असं मानलं जात आहे की, या तिघांच्या चौकशीनंतर काहीतरी पुढं येण्याची शक्यता पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिष्य म्हणाला, हा कोट्यवधींचा खेळ

दरम्यान, सुसाईड नोटच्या आधारावर नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्याने नाकारली आहे. तो म्हणाला की, प्रयागराजचे आयजी यात संशयित आहे, ते सतत नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात असायचे. आनंद गिरीने आरोप केला की, मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

Narendra Giri Death | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.