Aditya L1 | सूर्य मोहीमेच काऊंटडाऊन सुरु, सूर्याभोवती भ्रमण करुन भारताला काय मिळणार?
Aditya L1 | मिशन चांद्रयान-3 नंतर जाणून घ्या आता भारताच्या Aditya L1 मिशनबद्दल. भारत आता सूर्यावर स्वारी करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोटा येथील अवकाश तळावरुन लॉन्चिंग होणार आहे. भारताची ही पहिलीच सूर्यमोहिम आहे.
बंगळुरु : चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहीमेनंतर इस्रो आता आपल्या नवीन मिशनसाठी तयार आहे. चंद्रानंतर आता सूर्यावर स्वारी करायची आहे. शनिवारी 2 सप्टेंबरला इस्रोकडून आदित्य एल-1 सॅटलाइनट लॉन्च केलं जाणार आहे. सूर्याभोवती भ्रमंती करण्याच काम आदित्य एल-1 उपग्रह करणार आहे. या मिशनच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्य़ाचा इस्रोचा उद्देश आहे. सूर्या विषयीची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न असेल. इस्रोने लॉन्चिंग संबंधी सर्व तयारी पूर्ण केली आहे. या मिशनसंबंधी ताजी अपडेट काय आहे? मिशनकडून काय अपेक्षित आहे, त्या बद्दल जाणून घेऊया. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-1 मिशन लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंग आधीची रिहर्सल पूर्ण झाली आहे.
सर्व गोष्टी सुरळीत आहेत. आता फक्त लॉन्चिंगची प्रतिक्षा आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये एक जागा आहे, ज्याला L-1 पॉइंट म्हटलं जातं. सूर्यावर नजर ठेवण्यासाठी हा पॉइंट महत्त्वाचा आहे. इस्रो आपल्या आदित्य एल-1 उपग्रहाला याच कक्षेत प्रस्थापित करणार आहे. पृथ्वीपासून हे अंतर 1.5 मिलियन किमीवर आहे. आदित्य एल-1 हे भारताच पहिलं अस मिशन आहे, ज्या द्वारे पूर्णपणे सूर्याचा अभ्यास केला जाईल. या मिशनची कॉस्ट 400 कोटी रुपये आहे. PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-1 सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडलं जाईल. या मिशनमध्ये एकूण 7 पेलोडचा वापर केला जाईल. उपग्रहातील 4 पेलोड सूर्याचा अभ्यास करतील. उर्वरित 3 उपकरणं एल-1 क्षेत्राचा अभ्यास करतील.
आदित्य एल-1 मधून काय समजणार?
सध्या अनेक देशांमध्ये चांद्र मोहिमेची चढा-ओढ सुरु आहे. लवकरच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अशीच स्पर्धा सुरु होईल. आदित्य एल-1 च आयुष्य पाच वर्षांच असेल. तो इतका काळ सूर्याभोवती भ्रमण करेल. सूर्यावरील वादळं, सूर्यावरील कोरोना आणि अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळेल. इस्रोला या मिशनच्या माध्यमातून सूर्यावर भविष्यात काय घडणार आहे? त्याचीच नाही, तर याआधी काय घडून गेलय, त्याची सुद्धा माहिती मिळेल. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवरच बरच काही घडत. त्यामुळे त्याचा अभ्यास आवश्यक आहे. आदित्य एल-1 मधील वेगवेगळे पेलोड फोटो घेण्याच, तापमान मोजण्याच काम करतील. भारताच्या आधी कुठल्या देशांनी सूर्य मोहिमा केल्या आहेत?
भारताच्या आधी अमेरिका, जापान, यूरोप आणि चीनने सूर्याचा अभ्यास केलाय. सूर्यावर जाणारा भारत पहिला देश नाहीय. हे भारताच सूर्याच्या दिशेने पहिलं पाऊल नक्की आहे. अलीकडेच इस्रोने चांद्रयान-3 च्या रुपाने इतिहास रचला आहे. आता सर्व जगाची नजर या मिशनवर असेल.