Ayodhya Ram Mandir | पहिल्याच दिवशी रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी सारखी स्थिती, VIDEO

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत रामललाचा दरबार भक्तांसाठी आज खुला होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून रामभक्तांना दर्शन मिळण्यास सुरुवात होईल. मंदिरात एकूण किती आरत्या होणार? राम मंदिर व्यवस्थापनाने काय नियमावली बनवलीय? त्या बद्दल जाणून घ्या.

Ayodhya Ram Mandir | पहिल्याच दिवशी रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी सारखी स्थिती, VIDEO
Ayodhya Ram Mandir
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 8:05 AM

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत रामलला विराजमान झाले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून राम भक्तांना दर्शन मिळेल. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या दर्शन पूजनासाठी नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार आधी सुरु होतं, त्या प्रमाणेच पाचवेळा आरती होईल. याची सुरुवात पहाटे 4 वाजल्यापासून श्रृंगार आरतीने होईल. संध्याकाळी 7 वाजता संध्या आरती होईल. याच प्रकारे रात्री 10 वाजता शयन आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील. भक्तांसाठी रामललाचा दरबार सकाळी 8 वाजता सुरु होईल.

त्यानंतर भक्तगण पूर्ण श्रद्धेने आपल्या आराध्यच दर्शन घेऊ शकतील. ट्रस्टने जारी केलेल्या निर्देशानुसार, आज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत रामललांचे दर्शन बंद राहणार आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रामललाची मध्यान्ह भोग आरती होईल. त्यासाठी दरवाजे बंद होतील. या दरम्यान रामललाच्या दर्शन पूजनासाठी राम मंदिर परिसरात सकाळी 3 वाजल्यापासून भक्त जमायला सुरुवात झाली आहे. राम मंदिराच काल उद्घाटन झालं. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे.

नवीन परंपरा सुरु झालीय का?

लोक जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. लवकरच आराध्याच्या दर्शनाच सुख मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. रामललाची आरती आणि दर्शन पूजनासाठी कोणतीही नवीन परंपरा सुरु झालेली नाही, असं मंदिर व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलय. आधीप्रमाणेच प्रभूरामांची पाचवेळा आरती आणि भोग प्रसाद चढवणं सुरु राहील.

भक्तांच्या सुविधेसाठी विशेष पूजा विधान

भक्तांच्या सुविधेसाठी विशेष पूजा विधान म्हणजे श्रीरामोपासना संहिता बनवण्यात आली आहे. सोमवारी 22 जानेवारील रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य यजमान होते. आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित होते.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.